माओवादी चळवळीतील पसार झालेल्या प्रशांत कांबळे याला अटक

‘यूएपीए’नुसार वर्ष २०११ मध्ये गुन्हा

 प्रशांत कांबळे उपाख्य लॅपटॉप (सौजन्य : सिव्हिक मिरर)

पुणे – शहरी भागामध्ये माओवादी विचारधारेचा प्रसार करणारा प्रशांत कांबळे उपाख्य लॅपटॉप याला राज्य आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) ४ मे या दिवशी पिंपरी-चिंचवड परिसरातील चर्‍होली भागातून अटक केली. न्यायालयाने त्याला १३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कांबळे याच्या विरोधात ए.टी.एस्.च्या मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात ‘बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध अधिनियमान्वये’ (यूएपीए) वर्ष २०११ मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. तेव्हापासून तो पसार झाला होता.

कांबळे हा रायगड जिल्ह्यातील खोपोली परिसरात आदिवासी पाड्यांमधील मुलांना शिकवण्याचे काम करत होता. तो शहरी भागामध्ये बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या प्रसाराचे कार्य करत होता. त्याच्यावर गुन्हा नोंद झाल्यानंतर तो वेषांतर करून पसार झाला होता. ए.टी.एस्.कडून त्याचा शोध घेण्यात येत होता. न्यायालयाने त्याला पसार म्हणून घोषित केला होता.