सिंगापूरमध्येही ३० टक्के मुसलमानांनी केला इस्लामचा त्याग
वॉशिंग्टन – ‘द प्यू रिसर्च सेंटर’च्या एका अहवालानुसार अमेरिकेत मुसलमानांच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेत २५ टक्क्यांपेक्षा अधिक मुसलमानांनी इस्लाम सोडून ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे किंवा किंवा ते थेट नास्तिक होत आहेत. याविषयी माहिती देणारी ‘द प्यू रिसर्च सेंटर’ ही वॉशिंग्टनस्थित संघटना आहे. ही संघटना अमेरिका आणि जगाला भेडसावणार्या सामाजिक समस्या, जनमत आदी सूत्रांविषयी माहिती प्रदान करते.
१. या अहवालानुसार काही मुसलमानबहुल देशांमध्ये इस्लाम सोडणार्या लोकांची संख्या पुष्कळ अधिक आहे. तुर्कीयेमध्ये मुसलमान म्हणून जन्मलेले सुमारे ४ टक्के लोक आता स्वतःला मुसलमान मानत नाहीत. भारतात ही संख्या केवळ १ टक्के आहे.
२. भारतात धर्मांतर हा नेहमीच एक संवेदनशील आणि वादग्रस्त विषय राहिला आहे; पण युरोप आणि अमेरिके यांसारख्या विकसित देशांमध्ये मोठ्या संख्येने लोक त्यांचा धर्म सोडून नास्तिक होत आहेत किंवा दुसर्या धर्माचे पालन करू लागले आहेत.
३. सिंगापूरमध्येही सुमारे ३० टक्के मुसलमानांनी इस्लाम धर्म सोडला आहे, जो एक मोठा आकडा मानला जातो.
संपादकीय भूमिकाजगात विकसित देशांमध्ये मुसलमान इस्लामपासून दूर जात आहेत, याविषयी भारतात मुसलमानांचे लांगूलचालन करणार्या निधर्मीवाद्यांना काय म्हणायचे आहे ? |