
पुणे – रोहित कांबळे याने एकतर्फी प्रेमातून पीडितेच्या मनाविरोधात बळजोरीने शारीरिक संबंध ठेवले. पीडितेबरोबर मंदिरामध्ये लग्न केले. त्यानंतर मारहाण, शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिली. ५० लाख रुपयांची मागणी केली. तिचे नग्न अवस्थेतील छायाचित्रे सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेने रोहित कांबळे याच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यानुसार कांबळे याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी आणि पीडिता हे कोंढवा परिसरात रहातात. ते पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखतात.
संपादकीय भूमिकाअशा गुन्हेगारांना कायमची अद्दल घडेल, अशी कडक शिक्षा होणे आवश्यक ! |