भिवंडी येथे ३० लाख रुपयांच्या बनावट नोटा आणलेल्या तिघांना अटक 

भिवंडी येथे ३० लाख रुपये किंमतीच्या भारतीय चलनाप्रमाणे दिसणार्‍या ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त

संत सद्गुरु श्री धोंडीराज महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने विशेष पूजा !

पलूसचे साक्षात्कारी संत सद्गुरु श्री धोंडीराज महाराज यांच्या ११७ व्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने ६ मे या दिवशी विशेष पूजा, तसेच ५ मे या दिवशी १८ वा रथोत्सव भावपूर्ण वातावरणात पार

आळंदी येथे भाविकांसाठी विनामूल्य वाहनतळाची सोय !

ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायण सोहळ्यासाठी आळंदीमध्ये आलेल्या भाविकांच्या वाहनांच्या सोयीसाठी नगर परिषदेने ४ ठिकाणी विनामूल्य वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून दिली

७ ते १२ मे या कालावधीत आद्य शंकराचार्यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम ! – शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी, करवीरपीठ

आद्य शंकराचार्यांच्या २ सहस्र ५३३ व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने करवीरपीठ येथे ७ ते १२ मे या कालावधीत विविध कार्यक्रम होत आहेत.

‘कॉपीमुक्त परीक्षा अभियाना’मुळे १२ वी उत्तीर्णांची संख्या १.५ टक्क्यांनी घटली !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ५ मे या दिवशी राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत घोषित केला.

युद्धासाठी सरकार वेळ का घालवत आहे ? – विजय वडेट्टीवार, काँग्रेस

सरकारची भूमिका युद्धाची असेल, तर काँग्रेसचा पाठिंबा आहे; परंतु सरकार वेळ का घालवत आहे ? सध्या युद्ध केवळ वृत्तवाहिन्यांवरच चालू आहे. प्रत्यक्ष युद्ध करून धडा शिकवण्याची आवश्यकता आहे.

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे मान्यवरांना निमंत्रण !

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या निमित्ताने पुढील मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले. आमदार श्री. प्रशांत ठाकूर, भाजप, पनवेल , श्री. प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री, महाराष्ट्र

खारेगाव (ठाणे) येथील इमारतीच्या सज्जाचे प्लास्टर कोसळून ४ जण घायाळ

खारेगाव परिसरातील कावेरी हाईट्सजवळ तळमजला अधिक ३ मजले असलेली तनुजा सोसायटी आहे. ६ मे या दिवशी सकाळी त्यांच्या शयनगृहातील प्लास्टर कोसळले. यात खरात यांच्या कुटुंबातील ४ जण घायाळ झाले आहेत.

सिंधुदुर्गात आज होणार ‘मॉक ड्रिल’

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘मॉक ड्रिल’साठी दुपारी ३ ते ३.२० या वेळेत मालवण नगरपालिका क्षेत्र, वेंगुर्ला नगरपालिका क्षेत्र, सावंतवाडी नगरपालिका क्षेत्र, कणकवली नगरपालिका क्षेत्र, देवगड सागरी भाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि तिलारी धरण क्षेत्र निवडले आहे.

तलवारीने केक कापणार्‍या टिटवाळा येथील तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंद

तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी टिटवाळा येथील राहुल जटाशंकर श्रीवास्तव (वय २८ वर्षे) याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.