केंद्रीय गृह मंत्रालयाचा अनेक राज्यांना आदेश

नवी देहली – कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील अनेक राज्यांना ७ मे या दिवशी नागरी संरक्षणासाठी ‘मॉक ड्रिल’ आयोजित करण्यास सांगितले आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिली.
🚨 Centre to States: Conduct civil defence mock drills
⚠️Activate air raid sirens
🧍♂️Train civilians & students
🌑Ensure blackout & camouflage for vital sites
🚪Rehearse evacuation plans
Aim: Familiarize new gen with wartime SOPs#IndiaPakistanWar pic.twitter.com/nrnZ8q9J9c
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 5, 2025
सूत्रांच्या माहितीनुसार या मॉक ड्रिलमध्ये पुढील पावले उचलली जाण्याची शक्यता आहे –
१. हवाई आक्रमणाची माहिती देणारा सायरन सक्रीय केला जाईल.
२. कोणत्याही प्रकारचे आक्रमण झाल्यास स्वतःचे संरक्षण कसे करावे, याचे प्रशिक्षण सामान्य नागरिक, विद्यार्थी इत्यादींना दिले जाईल.
३. ‘ब्लॅक आऊट’ची (रात्रीच्या वेळेस दिवे बंद करणे) व्यवस्था केली जाईल. याचा अर्थ असा की, आवश्यकता पडल्यास वीज बंद करावी जेणेकरून शत्रूला कोणतेही लक्ष्य दिसू नये.
४. आक्रमण झाल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय कुठे घ्यावा ? याची माहिती आणि सराव केला जाईल.