शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश करावा ! – डॉ. अभय टिळक, प्रमुख विश्वस्त, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पुणे, १९ जुलै – जीवनाची पायाभरणी शालेय शिक्षणातून होत असल्याने त्यात संत साहित्याचा मोठ्या प्रमाणात समावेश करावा, तसेच संत साहित्य हे पाठांतराचे नाही तर आचरणाचे शिक्षण आहे, असे मत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांनी व्यक्त केले. ते ‘एम्.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ आणि श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या वतीने आयोजित भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषदेत भारतीय शिक्षण अभ्यासक्रमात ‘भारतीय संत गौण का ?’ या विषयावरील सत्रात बोलत होते.

डॉ. अभय टिळक पुढे म्हणाले की, प्रतिदिनच्या जीवनात संतांचे विचार डोकावतात का ? हे सर्वांनी पहावे. तसेच समता, प्रेम, सामंजस्य आणि बंधुभाव हे खर्‍या अर्थाने मानवी जीवन आहे. हे मूल्यशिक्षण पद्धतीत पर्याय म्हणून ठेवले आहे.