शोपिया येथे २ आतंकवादी ठार

१-२ आतंकवाद्यांना ठार करण्यासह त्यांच्या निर्मात्या पाकला नष्ट करा !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

शोपिया (जम्मू-काश्मीर) – येथे सुरक्षादलासमवेत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर इशफाक डार आणि अन्य एक आतंकवादी यांना ठार करण्यात आले. डार यापूर्वी जम्मू-काश्मीर पोलीस दलामध्ये होता. ४ वर्षांपूर्वी त्याने नोकरी सोडली होती.
२ दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये एका चकमकीत २ आतंकवादी ठार झाले होते.