कोल्हापूर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही शाळा ऑनलाईन चालू आहेत, तर काही प्रत्यक्षात चालू झाल्या आहेत. कोरोनामुळे या कालावधीत अनेकांना पुस्तके उपलब्ध होत नाहीत. तरी सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची इयत्ता १ ली ते १० पर्यंतची मराठी आणि इंग्रजी माध्यमांची पुस्तके पी.डी.एफ्. स्वरूपात खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ही पुस्तके सहज सोप्या पद्धतीने जलद गतीने डाऊनलोड करून घेता येतील. उत्तुरे फौंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबवला जात आहे, तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्री. महेश उत्तम उत्तुरे आणि शिवसेनेच्या माजी परिवहन सभापती सौ. प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांनी केले आहे.
पुस्तके डाऊलोड करण्यासाठी लिंक – http://utturefoundation.org

देहू (पुणे) ते पंढरपूर ‘सायकल वारी’ची दशकपूर्ती !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !