२ धर्मांधांना अटक !
स्वतःला अल्पसंख्य म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कारवाई न झाल्यामुळे असे प्रसंग वारंवार घडत आहेत.

अकोला – आतंकवादविरोधी पथकाने ८ जुलै या दिवशी एका चारचाकी वाहनातून घेऊन जात असलेल्या १२ गोवंशियांचे प्राण वाचवले आहेत, तसेच दुसर्या एका प्रकरणात पोलिसांनी गुटखा जप्त केला आहे. या दोन्ही घटनेप्रकरणी शकील अहमद अकील अहमद आणि शेख ख्वाजा फकीर मोहमद्द यांना पोलिसांनी अटक केली आहे.
आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख तथा रामदास पेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी १२ गोवंशियांना घेऊन येणार्या एका चारचाकी वाहनाची पडताळणी केली. त्यामध्ये १२ गोवंशियांना निर्दयपणे कोंडून हत्येसाठी नेण्यात येत होते. यामध्ये २ लाख ५० सहस्र रुपयांचे १२ गोवंश आणि ७ लाख ५० सहस्र रुपयांचे वाहन, असा एकूण ९ लाख ५० सहस्र रुपयांचा माल पोलिसांनी पकडला. या प्रकरणी शकील अहमद अकील अहमद याला अटक करून त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शेख ख्वाजा फकीर मोहमद्द याने इक्बाल मेंशन तेलीपुरा ताजनापेठ चौकीच्या मागे स्वतःच्या दुकानात अवैधरित्या गुटखा ठेवला होता. पोलिसांनी तेथे धाड टाकली असता अवैध गुटखा आणि सुगंधित सुपारी सापडली. त्याच्या जवळून विविध आस्थापनांचा गुटखा आणि सुगंधित सुपारी, असा एकूण १ लाख २६ सहस्र ५५० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात महाराष्ट्र गुटखा बंदी कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यातील ६ वैद्यकीय अधिकार्यांवर प्रशासनाची कारवाई !
पुणे येथे नदी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ४ वर्षांत ८ कोटी रुपये खर्च
Filmmaker Imtiaz Ali : चित्रपट निर्माते इम्तियाज अली यांची ‘राधा-कृष्ण’ यांच्यावर चित्रपट बनवण्याची इच्छा !
RSS Office Attack : रांची (झारखंड) येथील रा.स्व. संघाच्या कार्यालयावरील आक्रमणामागे आय.एस्.आय. असल्याचा संशय !
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर खाद्यविक्री चालू !