आझाद मैदानात मोर्चेकर्‍यांना भेटण्यास पत्रकारांना अनुमती दिली नाही !

रझा अकादमीच्या मोर्च्याची अनुमती नाकारली

मुंबई – राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे ५ जुलैला मुंबईच्या आझाद मैदानात १५ ते १८ लोकांनी आंदोलन करण्यास अनुमती मागितली होती. यातील केवळ ५ आंदोलनकर्त्यांना मैदानात बसण्यास अनुमती देण्यात आली. या आंदोलकांना भेटण्यासाठी पत्रकारांनी अनुमती मागितली होती; पण पोलिसांनी अनुमती नाकारली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच पत्रकारांना या आंदोलकांना भेटण्यास मुंबई पोलिसांनी अनुमती नाकारली आहे.

‘मुस्लिम आरक्षण मिळावे आणि धार्मिक दंगे भडकवणार्‍या विरोधात कारवाईविषयी कायदा करावा’, अशी मागणी घेऊन रझा अकादमी आणि वंचित बहुजन आघाडी मोर्चा काढणार होते; मात्र या मोर्चाला पोलिसांनी अनुमती नाकारली.