फणसाच्या पिठामुळे मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो !

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद आणि अमेरिकन डायबेटीस असोसिएशन यांचा निर्वाळा

प्रतिकात्मक छायाचित्र

कोचीन (केरळ) येथील जेम्स जोसेफ यांनी अनेक वर्षे प्रयोग करून ‘फणसाच्या पिठाचा (प्रतिदिन ३० ग्रॅम) आपल्या आहारात समावेश केला, तर साखर नियंत्रणात रहाते’, असा महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. ‘ग्लायकोसायलेटेल हिमोग्लोबीन’ (HbA1c) ही चाचणी केल्यावर आपल्या रक्तातील साखरेची सरासरी पातळी दर्शवते. तसेच उपाशीपोटी (Fasting Blood Sugar BS) आणि जेवल्यानंतर (Post Prandial Blood Sugar) रक्तातील साखर किती न्यून होते, असा निष्कर्ष प्रयोगाअंती काढला आहे. या संशोधनावर ‘भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आय.सी.एम्.आर्.)’ आणि ‘अमेरिकन डायबेटीस असोसिएशन’ यांनी शिक्कामोर्तब केले आहे .

जेम्स जोसेफ यांचे ‘God Own Office’ हे पुस्तक वाचून माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम प्रभावित झाले आणि त्यांनी जोसेफ यांना भेटायला बोलावले. या वेळी डॉ. कलाम यांनी सल्ला दिला की, लोकांच्या सवयी न पालटता प्रतिदिनच्या आहारात फणसाच्या पिठाचा (‘ग्रीन फ्लोअर’चा) समावेश कसा करता येईल, याकडे लक्ष देण्यास सांगितले. डॉ. कलाम यांच्या प्रेरणेने जेम्स यांनी ‘जॅकफूट ३६५’ बाजारात आणले. त्यांनी प्रतिदिनच्या आहारामध्ये पुष्कळ पालट न करता उत्तरेतील रोटी आणि दक्षिणेतील इडली यांमध्ये त्यांनी फणसाच्या पिठाचा समावेश केला.

सध्याच्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये ७५ टक्के रुग्ण मधुमेहामुळे गंभीर समस्येचा सामना करत आहेत. यादृष्टीने ‘जॅकफूट ३६५’ने क्रांती केली आहे, असे म्हणावे लागेल. मधुमेहावर ‘इन्सुलिन’ऐवजी केवळ १० रुपयांत फणसाचे पीठ उपलब्ध होते. नुकताच जेम्स जोसेफ यांना ‘राष्ट्रीय स्टार्ट अप अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. – अधिवक्ता विलास पाटणे

(साभार : व्हॉट्सॲप)