
कोल्हापूर, १ जुलै – कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्या ५ वर्षांपासून ६१३ वाहनांचे मूल्य अल्प दाखवून संगनमताने १ कोटी २३ लाख ३७ सहस्र रुपयांचा कर शासनाच्या तिजोरीत जमा न करता परस्पर हडप केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या रकमेचा कर शासनाकडे जमा केला नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचे अन्वेषण चालू असून याविषयीचा अहवाल येत्या आठवड्याभरात राज्य परिवहन आयुक्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांनी दिली.
या संदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणाले, ‘‘वाहनांची खरेदी एकाच मासात होत नाही. त्यामुळे वाहनांच्या खरेदीत तफावत असू शकते. याशिवाय वाहनांच्या रंगात पालट झाल्यास त्या वाहनांचे मूल्य अल्प-अधिक होऊ शकते. साधारणपणे वाहनांच्या मूल्यावर १० ते १६ टक्क्यांपर्यंत कर आकारला जातो. हे कार्यालय ३ जिल्ह्यांसाठी असले तरी ठपका असलेल्या ६१३ वाहनांची खरेदी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांनीच केली आहे आणि ही सर्वच वाहने ४ चाकी आहेत. कर चुकवण्यासाठी वाहनाच्या किमती अल्प दाखवल्या आहेत, असे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. वाहन विक्रेते अथवा कर्मचारी यात दोषी असतील, तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.’’
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !