मूत्राशयाशी संबंधित विकारांवरील उपाय !

  • लघवी होत नसल्यास : धने आणि गोखरू यांचा काढा तूप घालून द्यावा.
  • कष्टाने लघवी होत असल्यास : म्हणजेच मूत्रकृच्छ्रात दिल्या जाणार्‍या द्रव्यात गोखरू हे श्रेष्ठ द्रव्य आहे.
  • लघवीचे प्रमाण वाढल्यास : ओवा आणि तीळ एकत्र करून घ्यावेत.
  • मूतखडा
    १. इंद्रजव चूर्ण तृणपंचमूल काढ्याबरोबर द्यावे.
    २. कुळथाचा काढा + शरपुंखाचे चूर्ण २ ग्रॅम सैंधव घालून प्यावे.
    ३. गोखरूचे चूर्ण आणि मध मेंढीच्या दुधाबरोबर ७ दिवस प्यावे.
    ४. कुशावलेह : कुशमुळे, कासमूळ, उसाचे मूळ, शरमूळ, वाळा प्रत्येकी ४०० ग्रॅम घेऊन २० लिटर पाण्यात उकळून ५ लिटर राहीपर्यंत काढा करावा आणि त्यात काकडीचे बी, कोहळ्याचे बी, चिबुडाचे बी, ज्येष्ठमध, आवळा घालावा.
  • मूत्राशयाचे विकार, मूतखडा आणि प्रमेहनाशक : गुळवेलसत्त्व, वंशलोचन, वरुणाची साल, प्रियंगुसाल, वेलची, नागकेशर प्रत्येकी १ तोळा घालून त्याचा अवलेह करावा.
  • मूत्राशयांत सूज येऊन ताप आल्यास : धने आणि सुंठ यांचे पाणी प्यावे.