Skip to content
Skip to content
टक्कल पडणे
- इंद्रलुप्त (चाई) किंवा टक्कल : कडू पडवळाच्या (पटोल) पाल्याचा रस चोळावा.
- गुंजेचे मूळ बिब्याच्या रसात उगाळून लेप लावावा.
- गुंजा मधात अगर तुपात उगाळून लावाव्या.
- गुंजा, हस्तिदंताची राख आणि रसांजन यांचा लेप लावावा.
- जास्वंदाचे फूल गोमूत्रात वाटून लावावे किंवा जास्वंदाच्या फुलांनी किंवा पाला वाटून सिद्ध केलेला लेप लावावा.
- जेष्ठमध, गुंजा, मनुका, तिळाचे तेल आणि बकरीचे दूध एकत्र करून त्याचा टक्कलावर लेप लावावा.
घाम येणे
- घामाला वास येत असल्यास : कुष्ठ चूर्ण, जांभळाची पाने आणि अर्जुनाची साल यांचे वस्त्रगाळ चूर्ण करून अंगाला मसाज करावा.
- जास्त घाम येत असल्यास : कुळथाचे पीठ अंगास चोळावे.
- घाम बंद होण्यास : भाजलेले चणे, ओवा आणि वेखंड यांचे चूर्ण अंगाला चोळावे.
केस पिकणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे आणि वृद्धावस्था लवकर येऊ न देण्यासाठी उपयोगी रसायन : अश्वगंधा
तारुण्यपिटिका
- अर्जुनाची साल दुधात वाटून लेप लावावा.
- जुनी तिळाची पेंड गोमूत्रात कालवून लेप लावावा.
- तारुण्यपिटिकेत पू आला असल्यास आंबेहळद ओली करून लावल्याने तो अलगद बाहेर पडतो.
मुखदुर्गंधी
- केशराचा विडा तोंडात ठेवल्याने तोंडाचा दुर्गंध नाहीसा होतो.