साधनेचे प्रगल्भ दृष्टीकोन असणारी आणि गुरुकार्याच्या ध्यासामुळे संतांच्या कौतुकाला पात्र ठरलेली रामनाथी आश्रमातील कु. अमृता मुद्गल (वय १९ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अमृता मुद्गल एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ज्येष्ठ शुक्ल पक्ष चतुर्दशी (२३.६.२०२१) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारी कु. अमृता मुद्गल हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.  

कु. अमृता मुद्गल

कु. अमृता मुद्गल हिला १९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

सौ. वैशाली मुद्गल

१. आश्रमात दिवाळीच्या वेळी साधकसंख्या अल्प असतांना रात्री जागून सेवा करणे आणि त्या वेळी ‘सेवा करण्यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आध्यात्मिक ऊर्जा देतात अन् श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर चैतन्य देतात’, असा भाव असणे

एकदा दिवाळीच्या वेळी आश्रमातील अनेक साधक घरी गेले होते. त्या वेळी अमृता रात्री पुष्कळ वेळ जागून भावपूर्ण सेवा करत असे. तेव्हा मी तिला म्हणाले, ‘‘सकाळी उशिरा ऊठ. एवढी सेवा करायला तुला शक्ती कुठून मिळते ?’’ तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘मला सेवा करण्यासाठी श्री महालक्ष्मीदेवीचा अंश असणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आध्यात्मिक ऊर्जा देतात आणि श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर चैतन्य देतात, म्हणजे साक्षात् लक्ष्मी आणि नारायण मिळून माझ्याकडून सेवा करवून घेतात.’’ तिचे हे बोलणे ऐकून माझी भावजागृती झाली.

२. आईने अमृताला ‘तू अधिक सेवा करत असल्याने तुला लवकर देवाचे दर्शन होऊदे’, असे सांगितल्यावर तिने ‘अपेक्षा ठेवून कोणतीही सेवा करायची नसते आणि देव माझ्या समवेत आहे’, असे सांगणे

एकदा मी अमृताला म्हणाले, ‘‘तू किती सेवा करतेस ? तुला लवकर देवाचे दर्शन होऊदे; पण तुला देव भेटेल का ?’’ तेव्हा तिने सांगितले, ‘‘आई, अपेक्षा ठेवून कोणतीही सेवा करायची नसते; कारण देवाला मनातील सर्व कळते. आपण अपेक्षा ठेवून अहं आणि स्वभावदोष वाढवून सेवा केली, तर ते देवाला आवडेल का ? देव कशाला भेटायला पाहिजे ? तो तर माझ्या हृदयात, माझ्या समवेत आहे. देवाच्या आठवणी सतत माझ्या समवेत आहेत. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असते.’’

३. पू. (सौ.) संगीता जाधव यांनी साधिकेला ‘अमृताने सांगितलेले ऐकायला हवे’, असे सांगणे

एकदा मी ध्यानमंदिराला प्रदक्षिणा घालत होते. तेव्हा मला अमृता भेटली; म्हणून मी तिच्याशी बोलत थांबले. तेवढ्यात तेथे पू. (सौ.) संगीता जाधवकाकू आल्या. त्यांनी आम्हाला विचारले, ‘‘माय-लेकींचे काय बोलणे चालू आहे ?’’ तेव्हा अमृताने सांगितले, ‘‘आई ‘नामजप करणार नाही’, असे म्हणते.’’ तेव्हा पू. जाधवकाकू म्हणाल्या, ‘‘लेक सांगते, तर ऐकायला पाहिजे. मीसुद्धा तिचे ऐकते.’’ त्यांचे बोलणे ऐकून माझी भावजागृती झाली.

– सौ. वैशाली मुद्गल (कु. अमृता हिची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.११.२०२०)

संतांच्या कौतुकाला पात्र ठरलेली कु. अमृता !

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी अमृताची सेवा आणि साधनेचे प्रयत्न यांचे कौतुक करणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ नेहमी म्हणतात, ‘‘अमृता स्वतःचा कधीच विचार करत नाही. तिची ‘नेहमी दुसर्‍याला काय आणि किती देऊ ?’, अशी तळमळ असते. ती स्वतः काही खाऊ खाणार नाही; पण इतरांना पोट भरून खाऊ देईल. एवढ्या लहान वयातील तिचा सेवेचा ध्यास कौतुकास्पद आहे. तिच्यात व्यापकता आहे. अमृताचे चांगले प्रयत्न चालू आहेत. तिच्यामध्ये पुष्कळ पालट झाला आहे.’’

२. सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांनी अमृताला ‘व्यष्टी आणि समष्टी साधना करून लवकर प्रगती करा’, असा आशीर्वाद देणे

‘एकदा सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी अमृताला चॉकलेट दिले. तेव्हा अमृताने त्यांना नमस्कार केला. त्या वेळी सद्गुरु जाधवकाका तिला म्हणाले, ‘‘व्यष्टी आणि समष्टी साधना करून लवकर प्रगती करा. अमृता, मला तुझी फार आठवण येणार. तू दिलेल्या महाप्रसादाने माझे वजन वाढले आहे. तू आमच्या सर्वांची मनापासून सेवा केलीस.’’

३. पू. पृथ्वीराज हजारे यांनी ‘किती सेवा करतेस ?’ असे अमृताचे कौतुक करणे

एकदा अमृता रात्री सेवा करत होती. तेव्हा बाहेर पुष्कळ पाऊस पडत होता; म्हणून पू. हजारेकाका (पू. पृथ्वीराज हजारे) खिडक्या बंद करायला आले असतांना अमृताला बघून ते म्हणाले, ‘‘किती सेवा करतेस ? आता झोप. तुला भूक लागली असेल ना ?’’ तेव्हा त्यांनी त्यांच्या खोलीत जाऊन एक मोठा आंबा आणून अमृताला दिला. तेव्हा अमृताने त्या आंब्याच्या फोडी करून प्रसाद म्हणून साधकांना दिल्या. त्या वेळी पू. हजारेकाकांनी तिचे कौतुक केले.’

– सौ. वैशाली मुद्गल (आई)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक