वलसाड (गुजरात) येथे विवाहित धर्मांधाकडून जैन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण !

अशा धर्मांधांना शरियत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

आरोपी इम्रान अन्सारी (उजवीकडे)

वलसाड (गुजरात) – येथे एका १९ वर्षीय जैन धर्मीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर अपहरण करून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी इम्रान अन्सारी याला अटक केली आहे. अन्सारी विवाहित आहे. गुजरातमध्ये संमत झालेल्या धर्मस्वातंत्र्य कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. अन्सारी मूळचा बंगालमधील रहाणारा आहे. अन्सारी याने या तरुणीला अजमेरच्या दर्ग्यात नेऊन तिच्या गळ्यात ताविजही बांधला होता.