आतंकवाद्यांना धडा शिकवण्याचे काम सुरक्षादलांचे असून ते हे काम नेटाने करतच आहेत; पण आतंकवादी निर्माणच न होऊ देण्याचे काम शासनकर्त्यांचे आहे ! ते त्यांनी चोखपणे पार पाडले पाहिजे. त्यासाठी आतंकवाद्यांची निर्मिती करणारा पाकिस्तान आणि आतंकवाद्यांना आश्रय देणारे देशद्रोही यांच्याविरोधात कठोरात कठोर पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे !
श्रीनगर – ३ पोलीस आणि २ नगरसेवक यांची हत्या करणार्या लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेच्या ३ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी ठार केले. ठार झालेल्या आतंकवाद्यांमध्ये मुदासिर पंडित याचा समावेश असून तो लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर आहे. सध्या या परिसरात शोधमोहीम चालू आहे.
Pakistani among 3 top Lashkar commanders killed in Jammu and Kashmir encounter https://t.co/JdYwTT3QUm
— Hindustan Times (@HindustanTimes) June 21, 2021
बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथील गुंड ब्रथ परिसरात काही आतंकवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली. सुरक्षादलांनी या परिसराला वेढा घातला. या वेळी एका घरात लपून बसलेल्या आतंकवाद्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार चालू केला. त्यास सुरक्षादलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात रात्रभर चकमक चालू होती. शेवटी या आतंकवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षादलाला यश आले.

पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
तमिळनाडूमध्ये गाय आणि वासरू यांच्या हत्येवर उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीला सर्वाेच्च न्यायालयाकडून स्थगिती
कांदिवली येथे तरुणाकडून अल्पवयीन मुलीची हत्या !
उत्तरप्रदेश : ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्याला दोषीला २० वर्षांची शिक्षा