
ईश्वरी योजनेनुसार वर्ष २०२३ मध्ये भारतात ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होणारच आहे. संत आणि द्रष्टेपुरुष यांनाही त्याचे वेध लागले आहेत. भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलल्यानंतर गोप-गोपींनी ज्याप्रमाणे स्वतःचे कर्तव्य म्हणून त्यांच्या काठ्या गोवर्धन पर्वताला लावल्या, त्याप्रमाणे आपल्यालाही आपले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कर्तव्य बजावायचे आहे. आपण साधना म्हणून हिंदु राष्ट्रासाठी कार्य केले, तर हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासमवेत स्वतःचाही उद्धार होईल. कालमाहात्म्याप्रमाणे वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. या कालावधीत हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी धर्मकार्य केल्यास हिंदु राष्ट्र तर स्थापन होईलच; पण त्यासह प्रत्येकाला साधनेचे फळही मिळेल. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी तन-मन-धन अर्पण करा ! भगवान श्रीकृष्ण तुम्हाला ‘हिंदु राष्ट्र’ देईलच !
‘हिंदु राष्ट्राची स्थापना हेच आपल्या सर्वांचे ध्येय झाले, तर हिंदु राष्ट्राची पहाट उगवल्याविना रहाणार नाही !’
– परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
हिंदूंनो, धर्मशिक्षण घ्या आणि भगवंताची कृपा अनुभवा !
‘गूगल मॅप’ आणि ज्योतिषशास्त्र
कुत्र्याला श्रीकृष्णाच्या रूपात दाखवणार्या महिलेला जामीन देतांना हिंदूंच्या भावनांचा अनादर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निवाडा !
वारकरी संप्रदायाची वेशभूषा
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
तुका आकाशाएवढा…