
बेळगाव, १९ जून (वार्ता.) – १४ जून या दिवशी रात्री दरबार गल्ली येथे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी कार्यरत असणार्या पोलिसांवर समाजकंटकांनी आक्रमण केले होते. गेल्या काही दिवसांपासून सरकारी कर्मचार्यांवर आक्रमण होण्याचे प्रमाण वाढले आहे. तरी पोलिसांवर आक्रमण करणार्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन हमारा देश संघटनेच्या वतीने १८ जून या दिवशी पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन यांना देण्यात आले. या वेळी हमारा देश संघटनेचे सदस्य सर्वश्री जयशीलराव पोतदार, संतोष कागवाडे, मल्लीकार्जुन कोकणी, सम्राट, सचिन, देवदत्त, अजित, व्यंकटेश, संदीप, लक्ष्मीकांत, श्रीनिवास आणि इतर उपस्थित होते.
याच मागणीचे निवेदन उत्तर मतदार क्षेत्राचे आमदार श्री. अनिल बेनके यांना भेटून देण्यात आले. यापुढे अशा घटना घडू नयेत आणि सामाजिक शांतता भंग करणार्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने आमदारांना करण्यात आली. या संदर्भात श्री. अनिल बेनके म्हणाले, येत्या सोमवारी मी पोलीस आयुक्तांना भेटून त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करीन आणि प्रसारमाध्यमांसमोर हा विषय मांडेन
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन