उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. मयांक प्रशांत आचार्य हा आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
बेलुरू (कर्नाटक) येथील चि. मयांक प्रशांत आचार्य याचा ज्येष्ठ शुक्ल पक्ष सप्तमी (१७.६.२०२१) या दिवशी पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या वडिलांना त्याच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
चि. मयांक आचार्य याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक आशीर्वाद
१. दळणवळण बंदीच्या काळात बाळाचा जन्म होणे आणि प्रसुतीच्या वेळी आईला कोणताही त्रास न होणे
‘२९.५.२०२० या दिवशी चि. मयांकचा जन्म झाला. त्या वेळी कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात दळणवळण बंदी लावण्यात आली होती. लोकांना बाहेर पडणेसुद्धा कठीण झाले होते. अशा वेळी त्याचा जन्म झाला. प्रसुतीच्या वेळी त्याच्या आईला कोणताही त्रास झाला नाही.
२. जन्मानंतर
२ अ. मयांक सदैव आनंदात असतो. तो क्वचितच रडतो.
२ आ. त्याने रात्री उठून एकदाही त्रास दिलेला नाही. तो ३ मासांचा असल्यापासून रात्री अंथरूण ओले करत नाही.
२ इ. त्याचे कान पुष्कळ तीक्ष्ण आहेत. किंचितसुद्धा आवाज झाला, तर तो लगेच प्रतिसाद देतो.
२ ई. तो सर्वांशी सहजतेने जुळवून घेतो.
२ उ. देवाची आवड
१. ४ – ५ मासांचा असतांना देवघर पाहून तो पुष्कळ आनंदी होत असे.
२. तो दूध पितांना कधीतरी रडल्यास ‘जय श्रीराम ।’ असे म्हणताच तो रडायचे विसरून दूध पितो.
२ ऊ. त्याला गाणी पुष्कळ आवडतात. त्याला गाणे म्हणत झोपवले, तर तो शांतपणे गाणे ऐकत झोपतो.
३. अनुभूती
चि. मयांकच्या जन्मापासून घरी शांत वातावरण निर्माण होणे आणि आर्थिक परिस्थिती सुधारणे : त्याच्या जन्मापासून आम्ही पुष्कळ आनंदात आहोत. त्याच्या जन्माच्या वेळी आमची आर्थिक समस्याही दूर झाली. आमचे वडील घरी पुष्कळ भांडण करायचे; परंतु त्याच्या जन्मापासून भांडण थांबले आहे. बाळाशी खेळतांना ते आनंदात असतात. आमच्या घरी शांत वातावरण निर्माण झाले आहे. आमची आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारली आहे.’
– श्री. प्रशांत आचार्य, बेलुरू, कर्नाटक. (१७.१.२०२१)
|