सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
माझ्या खोलीतील देवघरातील देवतांच्या चित्रांवरील काचेत व्यक्तीची प्रतिमा आरशाप्रमाणे स्पष्ट दिसते. यात काचेचे रूपांतर आरशात होण्याची प्रक्रिया काय आहे ?’ (२५.१०.२०१९) |
श्री. राम होनप :
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या भक्तीमुळे त्यांच्या देवघरातील देवतांच्या चित्रांतील देवत्व जागृत होणे
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची साधना आणि भक्ती पुष्कळ आहे. त्यामुळे त्यांच्या देवघरातील देवतांच्या चित्रांतील देवत्व जागृत झाले आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे समष्टीच्या कल्याणाचे कार्य आहे. त्यांच्या भक्तीमुळे देवतांच्या चित्रांतील तत्त्व ‘साधकांचे रक्षण करणे, त्यांच्या साधनेसाठी शक्ती देणे, त्यांच्या धर्मकार्यातील अडथळे अन् वाईट शक्तींचा जोर न्यून करणे’ इत्यादी कार्यांसाठी प्रगट होते.
२. देवतांच्या चित्रांतील तत्त्व कार्यरत होऊन चित्रांत चैतन्याचा थर निर्माण होणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देवघरातील देवतांच्या चित्रांद्वारे वातावरणात सतत चैतन्य प्रक्षेपित होत असते. ही सूक्ष्मातील प्रक्रिया सातत्याने होत असल्याने त्या देवतांच्या चित्रांत चैतन्याचा जाड थर निर्माण झाला.

३. देवतांच्या चित्रांतील चैतन्याचा परिणाम चित्रावर होणे
देवतांच्या चित्रांत निर्माण झालेल्या चैतन्याच्या थरामुळे देवतांच्या चित्रांतील अणू-रेणू, रंग आणि आकार चैतन्यमय झाले. त्यामुळे चित्रातील देवत्व आणखी प्रगट होऊ लागले.
४. देवतांच्या चित्रानंतर चैतन्याचा परिणाम त्याच्या काचेवर होणे
देवतांच्या चित्रांत पुष्कळ चैतन्य निर्माण झाल्याने त्याचा परिणाम त्या चित्रांच्या काचांवर झाला. त्यामुळे त्या काचांतील अणू-रेणू चैतन्यमय झाले. चैतन्यामुळे त्या काचांतील अणू-रेणूंच्या प्रकाश शोषून न घेण्याच्या गुणधर्मात पालट झाला आणि त्यांच्यात प्रकाश शोषून घेण्याची क्षमता निर्माण झाली.
५. चैतन्यामुळे काचेतील अणू-रेणूंमध्ये प्रकाश शोषून घेण्याची क्षमता निर्माण कशी होते ?
चैतन्यामुळे देवतांच्या चित्रांवरील काचेतील अणू-रेणूंमध्ये प्रकाश शोषून घेणारी आकर्षणशक्ती निर्माण झाली. त्यामुळे त्या अणू-रेणूंमध्ये प्रकाश शोषून घेण्याची क्षमता निर्माण झाली. या प्रक्रियेमुळे देवतांच्या चित्रांतील काचेतील अपारदर्शकता वाढली. यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देवघरातील देवतांच्या चित्रांवरील काचेत आरशाप्रमाणे व्यक्तीची प्रतिमा दिसते. हा विषय सूक्ष्मातील ‘अणूशास्त्र आणि प्रकाशविज्ञान’, याअंतर्गत आहे.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(ज्ञान मिळण्याचा दिनांक : १२.३.२०२६, वेळ : सकाळी ११, कालावधी : १५ सेकंद)

आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात पुणे येथील शास्त्रीय गायक पंडित डॉ. संजय गरूड यांनी सादर केली गायनसेवा !
गुरुस्तवन भावांजली : वैराग्यस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !