पर्यावरण दिनानिमित्त विश्वनगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम
अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवडीची चळवळ गतिमान होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन शिवपुरी विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विश्वनगर येथे डॉ. राजीमवाले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री पाटील या होत्या.
या वेळी डॉ. राजीमवाले म्हणाले की, विश्वनगर विकास समितीने जे विविध कार्य हाती घेतले आहे ते कौतुकास्पद आहे. येथील जवळपास १०० झाडांच्या संरक्षणासाठी ट्री-गार्ड आणि पाण्याची व्यवस्था करण्याचे दायित्वहंी राजीमवाले यांनी घेतले असून विश्वकुंज या नामफलकाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे सोलापूर शाखा अभियंता राजेश जगताप, निसर्ग सेवा फाउंडेशनचे सुनील बिराजदार, शिवलिंगप्पा स्वामी, गुरव महाराज हसापूर, ग्रामविस्तार अधिकारी बळुर्गी, ग्रामपंचायत सदस्य मोनेश्वर नरेगल, ह.भ.प. वैरागकर गुरुजी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.