नारायणगाव (पुणे) ग्रामपंचायतीच्या आर्थिक अपव्यवहार प्रकरणी गुन्हा नोंद !

भ्रष्टाचारग्रस्त भारत !

नारायणगाव ग्रामपंचायत

नारायणगाव (पुणे) – शासकीय निधीचा अपहार करून ५० लाख ८४ सहस्र ३४३ रुपयांचा आर्थिक अपव्यवहार केल्याप्रकरणी नारायणगाव ग्रामपंचायतीच्या जयश्री म्हेत्रे, ज्योती दिवटे या तत्कालीन २ महिला सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे यांच्यावर नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही.