१०.६.२०२१ या दिवशी असणार्‍या कंकणाकृती सूर्यग्रहणाविषयीची माहिती

‘वैशाख अमावास्या, १०.६.२०२१, गुरुवार या दिवशी असणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे वेधादी कोणतेही नियम पाळू नयेत.

कंकणाकृती सूर्यग्रहण

१. ग्रहण दिसणारे प्रदेश

हे सूर्यग्रहण आशिया खंडातील उत्तरेकडील भाग, युरोपचा बराचसा भाग, आफ्रिका खंडाचा उत्तरेकडील प्रदेश, उत्तर अमेरिकेचा काही प्रदेश, अटलांटिक महासागर आणि आर्क्टिक प्रदेश येथे दिसेल.

२. सूर्यग्रहणाच्या वेळा

(भारतीय प्रमाण वेळेनुसार)

२ अ. स्पर्श (आरंभ) : १०.६.२०२१, दुपारी १.४२

२ आ. मध्य : १०.६.२०२१, दुपारी ४.१२

२ इ. मोक्ष (शेवट) : १०.६.२०२१, सायंकाळी ६.४१’

(संदर्भ : दाते पंचांग)

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (४.६.२०२१)