पणजी पोलिसांनी अनधिकृतपणे शस्त्रे विकणार्‍या तिघांना पुणे येथून घेतले कह्यात

ताळगाव येथील गोळीबार आणि मारहाण प्रकरण

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गुन्हेगारांना कठोर शासन होणे आवश्यक !

पणजी, ५ जून (वार्ता.) – ताळगाव येथील गोळीबार आणि मारहाण प्रकरणी पणजी पोलिसांनी अनधिकृतपणे शस्त्रे विकणार्‍या तिघांना पुणे येथून कह्यात घेतले आहे. ताळगाव येथे ३० मे या दिवशी झालेला गोळीबार आणि मारहाण प्रकरणी अन्वेषण करतांना पणजी पोलिसांनी पुणे येथे जाऊन राहुल जाधव, तौफिक शेख आणि कुणाल गायकवाड यांना कह्यात घेतले. त्यांच्याकडून ३ पिस्तुले आणि एक बोलेनो वाहन कह्यात घेण्यात आले आहे.