पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांच्यासह २ पोलीस घायाळ
| १. पारधी लोकांकडून घायाळ होणारे पोलीस आतंकवाद्यांशी कसे लढणार ? २. अवैध धंदे करणारा आणि कायद्याचे भय नसलेला समाज राष्ट्रासाठी घातक आहे. अशांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे ! |

वेळापूर (जिल्हा सोलापूर) – येथे दारूच्या हातभट्टीवर धाड टाकण्यासाठी गेलेल्या वेळापूर पोलिसांवर पारधी वस्ती येथे २८ मे या दिवशी प्राणघातक आक्रमण करण्यात आले. यामध्ये वेळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे आणि पोलीस कर्मचारी विठ्ठल बंदुके हे गंभीर घायाळ झाले आहेत, तर पोलीस नाईक दीपक मेहेरकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे. (पोलीसच स्वत:चे रक्षण करू शकत नसतील, तर सामान्य जनतेचे रक्षण कोण करणार ? – संपादक)
येथील पालखी चौक येथून पुणे रस्त्यावर असणार्या हॉटेल ऐश्वर्याच्या पाठीमागे काही अंतरावर पारधी वस्ती आहे. येथे वेळापूर पोलीस अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गेले असता पारधी वस्तीतील ५० ते ६० पुरुष आणि महिला यांनी मिळून वेळापूर पोलिसांवर प्राणघातक आक्रमण केले. (अवैध धंदे चालू रहाण्यासाठी पुरुषांसमवेत महिलांनीही पोलिसांवर आक्रमण करणे, हे गंभीर आहे ! – संपादक)
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती