नातेवाइकांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण हा स्तुत्य उपक्रम ! – ह.भ.प. बंडातात्या कराडकर महाराज

वृक्षलागवडीनंतर पाणी घालतांना ह.भ.प. बंडातात्या कराडकर आणि मान्यवर

सातारा – जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचेच आहे; परंतु तरुण वयातील मृत्यू स्वकियांना वेदनादायी असतो. मनुष्य शरीराने जातो; मात्र त्यांच्या स्मृती रहातात. स्मृतीप्रित्यर्थ कुटुंबियांनी राबवलेला वृक्षारोपण उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे, असे गौरोवोद्गार ह.भ.प. बंडातात्या कराडकर महाराज यांनी काढले.

मेढा येथील व्यापारी आणि व्यसनमुक्त युवक संघाचे विलास जवळ यांच्या घरी ते आले होते. विलास जवळ यांचे मसूर येथील साडू यांचे अल्पश: आजाराने निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी वनौषधी वृक्षाची लागवड ह.भ.प. बंडातात्या कराडकर महाराज यांच्या शुभहस्ते केली. तेव्हा ह.भ.प. कराडकर महाराज बोलत होते. या वेळी ह.भ.प. राजू महाराज, ह.भ.प. राम महाराज, ह.भ.प. सुरेशबुवा जवळ, ह.भ.प. तुकारामबुवा जवळ, अरुणबापू जवळ, आप्पा नावडकर, संजय अहिरेकर, आकाश जवळ, जवळवाडी गावच्या सरपंच वर्षा विलास जवळ आदी मान्यवर उपस्थित होते.