आपले आई-वडील, आपण, आपली पत्नी आणि मुले मिळून एक सुंदर संच सिद्ध होतो. सर्व मंडळींनी आपापली कर्तव्ये व्यवस्थित पार पाडली आणि आपल्या मर्यादा सांभाळून वागले, तर ते घर भूतलावरील स्वर्ग होईल. स्वर्ग बनण्यासाठी संपत्ती हेच सर्वस्व नाही, तर तो आवश्यक भाग आहेच; पण कुटुंबातील घटकांचे परस्परांशी सौहार्दपूर्ण आणि जिव्हाळ्याचे संबंध हाच कौटुंबिक सौख्याचा प्राण आहे.

घर नव्हे, अरण्य ते कोणते ?
एक संस्कृत कवी म्हणतो,
‘यत्र नास्ति दधिमन्थनघोषो यत्र नो लघुलघूनि शिशूनि ।
यत्र नास्ति गुरुगौरवपूजा तानि किं बत गृहाणि वनानि ॥
अर्थ : जेथे दही घुसळल्याचा आवाज येत नाही, जेथे छोटी छोटी बालके नाहीत, जेथे वडील मंडळींच्या वडीलपणाचा आदर नाही, ती कसली आली आहेत घरे ? ती तर अरण्ये होत !’
– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
हिंदु धर्मच युरोपला वाचवू शकेल !
भारतीय संस्कृती धर्मसत्तावादी !
प्राचीन हिंदु धर्माची महानता
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?