१ मे नंतर होणाऱ्या प्रत्येक मृत्यूस राज्य सरकार उत्तरदायी ! – डॉ. सुजय विखे-पाटील, खासदार, भाजप

नगर – आपल्याकडे असलेल्या दोन्ही लस आपल्या देशाच्या आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी राज्य सरकारने लस घेण्यासाठी कुठल्याही प्रकारे दिरंगाई न करता १ मे पासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला तातडीने विनामूल्य लस द्यावी. ठरल्याप्रमाणे लस दिली नाही, तर यानंतर या वयोगटातील होणाऱ्या या प्रत्येक मृत्यूला राज्यातील महाविकास आघाडी उत्तरदायी असेल, अशी चेतावणी नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी दिली आहे.

४५ वर्षे वयोगटापुढील सर्व नागरिकांच्या लसीकरणाचा व्यय केंद्राने केला आहे, तर महाराष्ट्र नव्या पिढीच्या लसीकरणाचा व्यय का करू शकत नाही ? राज्य सरकारला आमची हात जोडून विनंती आहे की, टेंडर आणि अन्य प्रक्रियेत वेळ न घालता १ मे पासून थेट लसीकरणास प्रारंभ करावा. त्यासाठी लागणारी यंत्रणा या २-४ दिवसांत सिद्ध करावी, असेही खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.