‘परात्पर गुरु डॉक्टर’ आणि ‘प.पू. डॉक्टर’ या नावांशी संबंधित सूक्ष्म प्रयोग करतांना साधकाला जाणवलेली सूत्रे

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. ‘परात्पर गुरु डॉक्टर’ आणि ‘प.पू. डॉक्टर’ या नावांशी संबंधित सूक्ष्म प्रयोग करावासा वाटणे

‘२४.५.२०२० या दिवशी ‘सूक्ष्मातील सॅनिटायझर’ या विषयावर देवाने सुचवलेले विचार संकलनाला पाठवत असतांना ‘प.पू. डॉक्टर’ असा उल्लेख करायचा कि ‘परात्पर गुरु डॉक्टर’, असा उल्लेख करायचा हे माझ्या लक्षात येत नव्हते; कारण ‘परात्पर गुरु डॉक्टर’ हे शब्द उच्चारल्यावर भाव जागृत होत नव्हता. कदाचित् ‘मी लहानपणापासून ‘प.पू. डॉक्टर’ असेच म्हणत असल्याने या शब्दांविषयी अधिक जवळीक झाली असावी’, असे मला वाटले. त्यानंतर प.पू. डॉक्टरांच्या संगणकीय छायाचित्राकडे पहात असतांना माझा भाव जागृत झाला आणि मनात विचार आला, ‘सूक्ष्मातील प्रयोग करून पाहू शकतो.’ त्यानंतर ती कृती माझ्याकडून लगेच झाली नाही.

श्री. नीलेश पाध्ये

२. प्रयोगासंदर्भात पुन्हा विचार आल्याने घरातील सर्वांकडून त्या संदर्भात प्रयोग करवून घेणे

८.६.२०२० या दिवशी रात्री माझ्या मनात या प्रयोगासंबंधी पुन्हा विचार येऊ लागले आणि ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी इतके सुचवले, तरीही मी करत नाही’, असा विचार माझ्या मनात आला. तेव्हा मी लगेचच कागदाचे दोन एकसारखे तुकडे घेतले. एकावर ‘परात्पर गुरु डॉक्टर’ आणि दुसऱ्यावर ‘प.पू. डॉक्टर’, असे लिहिले. मी ते कागद माझी पत्नीला (सौ. जानकीला) सारख्याच दिसणाऱ्या पाकिटांमध्ये ठेवायला सांगितले. ‘आम्ही (आई, वडील, मी आणि सौ. जानकी) ती दोन्ही पाकिटे हातात धरून काय जाणवते ?’, ते पहिले.

३. या प्रयोगामध्ये घरातील प्रत्येकाला जाणवलेली सूत्रे  

अ. माझ्या आई-वडिलांना ‘प.पू. डॉक्टर’, असे लिहिलेले पाकीट हातात घेतल्यावर त्यांना पुष्कळ शांत आणि हलके वाटले.

आ. ‘प.पू. डॉक्टर’ असे लिहिलेले पाकीट माझ्या ज्या हातात होते, त्या हातात मला पुष्कळ हलके आणि शांत वाटले. त्याचप्रमाणे माझ्या ज्या हातात ‘परात्पर गुरु डॉक्टर’, असे लिहिलेले पाकीट होते, तेथे मला शक्तीची कंपने जाणवली.

इ. माझ्या पत्नीला ‘परात्पर गुरु डॉक्टर’, असे लिहिलेल्या पाकिटातून शक्ती जाणवली.

वरील प्रयोगाचे उत्तर नेमके काय आणि नक्की काय लिहायचे ? याचे निश्चित उत्तर मिळाले नसले, तरी मला यातून पुढील गोष्ट शिकायला मिळाली.

४. ‘सूक्ष्मातील प्रयोग’ हे शस्त्र प.पू. डॉक्टरांनी सर्व साधकांना शिकवलेले असणे

पुढे येणाऱ्या भयंकर अशा आपत्काळात आपल्याला मार्गदर्शन करायला कदाचित् कुणी जवळ नसेल, ‘आपले मन आणि बुद्धी यांना काय करावे ?’, हे समजत नसेल, अशा वेळी साधकांनी डगमगून न जाता परात्पर गुरु डॉक्टरांना शरण जाऊन सूक्ष्मातून उत्तर जाणण्याचा प्रयत्न करावा. ‘सूक्ष्मातील प्रयोग’ हे शस्त्र प.पू. डॉक्टरांनी संस्थेच्या स्थापनेपासून आपल्या सर्व साधकांना शिकवले आहे अन् आपल्याकडून ते करवूनही घेतले आहेत.

५. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘सतत काळाच्याही पुढे जाऊन आम्हा सर्व साधकांची तळहातावरील फोडाप्रमाणे, आईप्रमाणे काळजी घेणाऱ्या परात्पर गुरु डॉक्टरांच्याप्रती मी कृतज्ञता कशी व्यक्त करू शकतो ?’, हे मला काहीच सुचत नाही. ‘परात्पर गुरु डॉक्टरच सर्वस्व आहेत आणि त्यांनीच आता आमच्याकडून कृतज्ञताही व्यक्त करवून घ्यावी’, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !’

– श्री. नीलेश पाध्ये, फोंडा, गोवा. (१०.६.२०२०)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक