कलियुगातील कलियुगी हिंदु राष्ट्र यावे, ही एकच आस ।

सौ. अंजली विभूते

त्रेतायुगी राक्षस रावण वध करण्यासाठी प्रभु श्रीरामचंद्र प्रकटले ।
द्वापरयुगी धर्मद्रोही कौरव माजता पांडवांसी रक्षण्या श्रीकृष्ण अवतरले ॥ १ ॥

सोळाव्या शतकात यवन मातल्याने जिजाऊंच्या रूपे आई भवानी प्रकटली ।
तिने छत्रपती शिवाजी महाराजांकडून ‘हिंदवी स्वराज्या’ची स्थापना केली ॥ २ ॥

हिंदु धर्म आणि ‘हिंदवी स्वराज्य’ यांची रक्षणकर्ती जिजामाता ठरली ।
तिने शेवटचा श्‍वास सोडला शिवराज्याभिषेकाचा सोहळा पाहूनी ॥ ३ ॥

घोर कलियुगांतर्गत कलियुगी अवतरले परात्पर गुरुदेव (टीप) महान ।
सूक्ष्मातील अतीगूढ विषय शब्दबद्ध करून निर्मिली ग्रंथसंपदा महान ॥ ४ ॥

पृथ्वीतलावर कुणीही त्यांच्यासारखे कदापीही न दिसती ।
असे हे परात्पर गुरुदेव महान थोर असती कलियुगी ॥ ५ ॥

जैसे श्रीविष्णूचे अवतार श्रीकृष्ण आणि श्रीराम थोर ।
सनातन संस्थेमुळे आम्हा लाभली परात्पर गुरुमाऊली थोर ॥ ६ ॥

कलियुगातील कलियुगी हिंदु राष्ट्र यावे, ही एकच आस ।
‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ या ध्यासासाठी प्रत्येक श्‍वास ॥ ७ ॥

टीप – परात्पर गुरु डॉ. आठवले

– सौ. अंजली बाळासाहेब विभूते, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.३.२०१८)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक