क्षुल्लक कारणावरून तलाक देणार्या धर्मांधांची मानसिकता जाणा !
संभाजीनगर – शहरातील सिटी चौक परिसरातील अरहान गोल्ड नाज टॉवर येथील रहिवासी शहबाज आली खान मकसूद अली खान (वय ३२ वर्षे) याला पत्नीने दूध आणण्यास सांगितले होते; मात्र शाहबाज याने दूध आणले नाही. यावर ‘तुम्ही दूध का आणले नाही ?’, अशी विचारणा पत्नीने केली असता त्याने पैसे नसल्याचे कारण सांगितले. या वेळी ‘दूध आणण्यासाठीही तुमच्याकडे पैसे नाहीत का ?’, असा प्रश्न पत्नीने केला. यावर संतप्त झालेल्या शाहबाज याने पत्नीला मारहाण करत तिला तीनवेळा तलाक देत घरातून हाकलून दिले, तसेच परत घरी आल्यास जीवे मारण्याची धमकीही पत्नीला दिली. यानंतर पीडित पत्नीने सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून शाहबाज याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.