१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण !

नवी देहली – येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आणि वैद्यकीय संघटना, राजकीय पक्ष आदींनी केलेल्या मागणीमुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.