तरुणांनी आतंकवादी संघटनांची नावे सांगून खंडणी उकळण्याचा प्रकार धक्कादायक !
ठाणे, १६ एप्रिल (वार्ता.) – शहापूर तालुक्यातील वासिंद शहर शिवसेनेचे पदाधिकारी आणि उद्योजक दत्ता ठाकरे यांच्याकडे इसिस, तसेच जैश-ए-मोहंमद या आतंकवादी संघटनांच्या नावाने २५ लाख रुपयांच्या खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी वासिंद पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून येथील टेंभरे गावाचा रहिवासी वैभव किसन सातपुते या खंडणीखोर तरुणाला अटक केली आहे.