सर्वोच्च न्यायालयाचे नवनिर्वाचित सरन्यायाधीश एन्.व्ही. रामण्णा यांनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन !

देशाच्या सरन्यायाधिशांनी मंदिरात जाऊ नये, अशा प्रकारची मागणी पुरो(अधो)गाम्यांनी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

सरन्यायाधीश रामण्णा भगवान वेंकटेश्‍वर यांचे चित्र स्विकारताना

तिरुपती (आंध्रप्रदेश)- सर्वोच्च न्यायालयाचे नवनिर्वाचित सरन्यायाधीश एन्.व्ही. रामण्णा यांनी येथील तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन भगवान वेंकटेश्‍वराचे दर्शन घेतले. त्यांनी मंदिरात अनुमाने एक घंटा घालवला, अशी माहिती मंदिराच्या अधिकार्‍यांनी दिली.

आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले सरन्यायाधीश रामण्णा हे पत्नी शिवमालासह दर्शन घेण्यास आले होते. पूजेनंतर मंदिर बोर्डाचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी आणि कार्यकारी अधिकारी के.एस्. जवाहर रेड्डी यांनी सरन्यायाधीश रामण्णा यांना पवित्र रेशीम वस्त्र, भगवान वेंकटेश्‍वर यांचे चित्र आणि प्रसाद देऊन त्यांचा गौरव केला.