भोपाळ येथे दुकान बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांकडून आक्रमण !

  • रात्रीची संचारबंदी असतांना नियमबाह्यरित्या चालू होते दुकान !

  • पोलिसांवर उकळता चहा ओतला !

  • नियमांचे पालन न करता उलट पोलिसांवर प्राणघातक आक्रमणे करणार्‍या अशा धर्मांधांवर कठोर कारवाई केली पाहिजे ! अशी कारवाई करण्याची मागणी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनीही केली पाहिजे !
  • भारतभरातील पोलीस धर्मांधांच्या हातून मार खातात. या पोलिसांना योग्य प्रशिक्षण दिले जात नाही, असे समजायचे का ?
भोपाळ येथे दुकान बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांकडून आक्रमण.

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील काझी कॅम्प परिसरात ३ एप्रिलच्या रात्री ११ वाजता मदीना टी स्टॉल हे चहाचे दुकान बंद करण्यास गेलेल्या पोलिसांवर दुकानाचा मालक जहीर याचा मुलगा सावेज, सुलेमान आणि त्याचे सहकारी यांनी पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण केली. तसेच त्यांच्यावर उकळता चहा ओतला. (पोलिसांवर उकळता चहा ओतण्याचे दुःसाहस धर्मांध करतात, यातून त्यांना कायद्याचे भय राहिले नसल्याचे दिसून येते ! – संपादक)

तसेच याच दुकानाच्या वर असलेल्या घरातून पोलिसांवर दगडफेक केली. (धर्मांध नेहमीच दगड किंवा तत्सम शस्त्रे यांचा साठा करतात आणि त्यांना हवे तेव्हा समाजविघातक कृत्य करतात ! – संपादक) यात घरातील महिलांचाही समावेश होता. या दगडफेकीत काही पोलीस घायाळ झाले. (धर्मांधांच्या हातून मार खाणारे पोलीस हिंदूंवर मर्दुमकी गाजवतात ! – संपादक) कोरोनामुळे भोपाळमध्ये रात्री ९ पासून संचारबंदी लागू केल्याने पोलिसांनी दुकान बंद करण्यास सांगितले होते.