अतिक्रमणाच्या विरोधात ग्रामस्थांना आंदोलन करावे लागणे प्रशासनाला लज्जास्पद !
मालवण – तालुक्यातील खालची रेवंडी येथे खाडीच्या किनार्यालगतचे कांदळवन आणि पत्तन विभागाने बांधलेल्या बंधार्याची तोडफोड करून काही व्यक्तींनी खाडीपात्रात अतिक्रमण केले आहे. याविषयी संबंधित प्रशासकीय कार्यालयात निवेदन देऊनही संबंधित विभागांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. संबंधितांवर ठोस कारवाई होण्यासह अतिक्रमण हटवावे, यासाठी रेवंडी ग्रामस्थांनी यापूर्वीच घोषित केल्यानुसार सोमवार, ५ एप्रिल २०२१ या दिवशी सकाळी १० वाजता रेवंडी येथे खाडीपात्रात आंदोलन करणार आहोत. आमच्या या भूमिकेला तळाशील आणि सर्जेकोट येथील ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे, अशी माहिती माजी सरपंच युवराज कांबळी यांनी दिली.
याविषयी बोलतांना कांबळी पुढे म्हणाले की, खाडीपात्रात जांभा दगड आणि माती टाकून मार्ग सिद्ध केला जात आहे. त्यामुळे खाडीचा प्रवाह पालटला जाऊन गावे उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. याविषयी निवेदन दिल्यावर शासकीय पंचनामे झाले. कांदळवन आणि बंधारा तोडल्याचे स्पष्टही झाले. कांदळवन तोडणे हा गंभीर गुन्हा असतांना शासकीय पंचनामे होऊनही वनविभाग कारवाई का करत नाही ? याचा खुलासा वनविभाग आणि पत्तन विभाग यांनी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांच्या समक्ष करावा. वनविभाग आणि पत्तन विभाग या विभागांच्या अधिकार्यांच्या चौकशीची मागणी जिल्हाधिकार्यांकडे आम्ही
करणार आहोत.