कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे दुसर्यांदा उल्लंघन

बार्शी (जिल्हा सोलापूर) – शहरातील कपूरबा इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाला ३० दिवसांसाठी टाळे ठोकले असून दुकान मालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोणत्याही दुकानात विनामास्क ग्राहक आढळल्यास दुकानदारास १ सहस्र रुपये दंड, तर दुसर्यांदा नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास २ सहस्र रुपये दंड आणि गुन्हा नोंद करून ३० दिवसांसाठी दुकान बंद करण्यात येईल, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. याविषयी माहिती असूनही दुसर्यांदा नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री