१. उत्कृष्ट व्यवस्थापन
‘ISO’, ‘SS’ इत्यादी ठिकाणी आदर्श व्यवस्थापनाचे धडे दिले जातात; परंतु सनातनच्या रामनाथी आश्रमात सर्वांत चांगले व्यवस्थापन शिकायला मिळाले.
२. आश्रमात सत्ययुगाचे दर्शन घडणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना सकारात्मक आणि निर्दोष व्यक्तीमत्त्वाचे धडे देऊन घडवले आहे. त्यामुळे या कलियुगात मला सत्ययुगाचे दर्शन घडले.
३. आलेल्या अनुभूती
अ. मी ध्यानमंदिरात आरतीला गेलो होतो. तेव्हा मला ‘माझ्याभोवती आणि माझ्याशेजारी उभ्या असलेल्या २ साधकांच्या भोवती (प्रत्येकाच्या देहाच्या आकाराप्रमाणे) अनिष्ट शक्ती उभ्या असून त्या तेथून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेत’, असे जाणवले.
आ. मी आश्रमात पू. आनंदी पाटील यांची ध्वनीचित्र-चकती बघत होतो. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि ‘त्या संत मीराबाई अन् संत तुकाराम महाराज यांच्यासारख्या भावास्थेत आहेत’, असे मला वाटले.
इ. आश्रमात मला संतांचा सत्संग मिळाला. ते माझ्यासमोर उभे असतांना ‘त्यांच्या देहाभोवती सोनेरी वलय असून ते श्रीकृष्णाप्रमाणे दिसत आहेत’, असे मला वाटले.’
– श्री. बल्लाळ रघुनाथ काणे, पनवेल (१९.२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |