सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले – साधनेच्या संदर्भात इतरांना जे काही साहाय्य करता येईल, ते करण्याचा मी प्रयत्न करतो !

माझ्या जीवनशैलीचा विचार करतांना मला जाणवले की, माझ्या संपर्कात जे कुणी येतात, त्यांच्या समवेत मी काही मिनिटे असो किंवा काही घंटे असो, त्यांना साधनेच्या संदर्भात जे काही साहाय्य करता येईल, ते करण्याचा माझा प्रयत्न असतो. ‘असे करणे माझी साधनाच आहे’, असे मला वाटते. ‘मला आणि साधकांना ईश्वराकडून मिळणारे ज्ञान सर्वांपर्यंत पोचवण्याचा सातत्याने प्रयत्न करणे, हीही माझी साधनाच आहे’, असे मला वाटते. माझ्या प्रयत्नांचे आणि संत तुकाराम महाराज यांच्या ‘आता उरलो उपकारापुरता ।’ या उक्तीशी काही साम्य आहे का ? (२४.८.२००९)
१. संत तुकाराम महाराज यांची आध्यात्मिक स्थिती

१ अ. संत तुकाराम महाराज यांनी ईश्वराशी एकरूपता साध्य केल्याने त्यांच्या वैयक्तिक जीवनाचे कार्य संपणे : संत तुकाराम महाराज यांनी भक्तीद्वारे ईश्वरप्राप्ती साध्य केली. अशा स्थितीत संतांचे ‘संचित, प्रारब्ध आणि अहं’ हे संपलेले असते. त्यांचे जीवन ईश्वरमय झालेले असते. अशा वेळी त्यांना जीवनात स्वतःसाठी काही करण्याची इच्छा नसते. त्यामुळे अशा उच्च आध्यात्मिक जीवनात वैयक्तिक जीवनाचे कार्य संपुष्टात आलेले असते.
१ आ. सर्वांप्रती कृतज्ञता : संत तुकाराम महाराज यांना ‘स्वतःला अध्यात्मातील ईश्वरप्राप्तीचे सर्वाेच्च ध्येय साध्य झाले आहे. त्यात समाजाचाही वाटा आहे’, असे वाटत होते. साधना करतांना जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले ‘अन्न, वस्त्र, निवारा आणि धन’, हे मिळवण्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष समाजाचाही वाटा असतो. संत तुकाराम महाराज यांच्या मनात ‘सर्वांच्या सहयोगाने मला ईश्वरप्राप्तीचे ध्येय साध्य झाले आहे’, याची जाणीव होती. या कृतज्ञतेने संत तुकाराम महाराज इतरांना भक्तीचा मार्ग दाखवत होते.

१ इ. ईश्वराच्या प्रीतीचे प्रगटीकरण : संत तुकाराम महाराज यांना ईश्वराची प्राप्ती झाली होती. अशा स्थितीत संतांमध्ये भगवद्प्रेम उत्पन्न होते. त्यामुळे संत निरपेक्ष प्रेमाने इतरांसाठी काहीना काही करत असतात.
१ ई. समष्टीचे कल्याण, हीच ईश्वरसेवा मानणे : संत तुकाराम महाराज यांच्यासाठी सर्व जग ईश्वरमयच होते. त्यामुळे ते इतरांना साहाय्य करणे, हे ‘ईश्वरसेवा’ म्हणून करत होते.
१ उ. स्वतःतील अवतारत्व जागृत होणे : संत तुकाराम महाराजांच्या साधनेमुळे त्यांच्या स्वतःमध्ये अवतारत्व जागृत झाले होते. त्यामुळे त्यांना ‘साधकांना साहाय्य करणे, हे कर्तव्यकर्मच आहे’, याची जाणीव होती. ‘संतांना असे वाटणे’, हे त्यांच्यातील अवतारत्व जागृत झाल्याचे लक्षण मानले आहे.
१ ऊ. संत तुकाराम महाराज यांच्या ‘आता उरलो उपकारापुरता’ यातील ‘उपकार’, या शब्दाचे अर्थ
१ ऊ १. उपकार फेडणे : संत तुकाराम महाराज यांच्यात ‘इतरांचे साहाय्य मिळाल्यामुळे मला ईश्वरप्राप्ती झाली आहे. हे समाजाचे माझ्यावर उपकार आहेत. ते उपकार फेडण्यासाठीच माझे जीवन आहे’, असा भाव होता. हा संत तुकाराम महाराज यांचा समाजाप्रतीचा कृतज्ञताभाव होता.
१ ऊ २. उपकार करणे : संत तुकाराम महाराज यांच्या मनात, ‘मला जसे भक्तीद्वारे ईश्वरप्राप्ती साध्य झाली आणि माझ्या जीवनाचे सार्थक झाले, तसे इतरांचे व्हावे’, असा भाव होता. हा कल्याणाचा मार्ग ते इतरांना नामसाधना सांगून दाखवत होते. याला ते ‘उपकार’, असे संबोधतात. या अर्थाने संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘आता उरलो उपकारापुरता । ’
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आध्यात्मिक स्थिती
२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘इतरांना साहाय्य करणे, ही साधनाच आहे’, असे वाटण्याचे कारण : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे अस्तित्व आणि आशीर्वाद यांमुळे सनातनचे कार्य दीर्घकाळापासून अव्याहतपणे चालू आहे, तसेच साधकांची जलद आध्यात्मिक प्रगती होत आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांमधील अहंलय झाला असल्यामुळे त्यांना ‘सनातनचे कार्य त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचे आशीर्वाद आणि साधक करत असलेला तन-मन-धन यांचा त्याग यांमुळे चालू आहे’, असे वाटते. या कृतज्ञताभावामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना ‘साधकांना साहाय्य करणे, ही माझी साधनाच आहे’, असे वाटते. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या मनात साधकांना सतत साहाय्य करण्याचा विचार असतो.
२ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांना ‘स्वतःला आणि साधकांना ईश्वराकडून मिळणारे ज्ञान सर्वांपर्यत पोचवण्याचा सातत्याने प्रयत्न करणे, हीसुद्धा माझी साधनाच आहे’, असे वाटण्याचे कारण : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी साधनेने ईश्वरप्राप्ती साध्य केली. ‘हा ईश्वरी आनंद सर्व साधकांना लवकर मिळावा आणि साधकांच्या जीवनाचे सार्थक व्हावे’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना वाटत असते. ईश्वरप्राप्तीचे ध्येय साध्य करतांना साधकांना येणार्या विविध अडथळ्यांवर उपाय सांगण्याचा, तसेच साधकांच्या मनातील विविध शंका दूर होणे, यांसाठी त्यांना स्वतःला, तसेच साधकांना ईश्वराकडून मिळणारे ज्ञान सर्वांपर्यंत लवकरात लवकर पोचवण्याचा ध्यास लागलेला असतो.
२ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर शिष्यभावात असणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांनी अध्यात्मातील अत्युच्च स्थिती साध्य केली, तरी ते शिष्यभावात असतात. त्यामुळे ते ‘साधकांना साहाय्य करणे, ही गुरुसेवाच आहे’, असा भाव ठेवतात.
३. संत तुकाराम महाराज यांच्या वर दिलेल्या आध्यात्मिक स्थितीप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची आध्यात्मिक स्थिती आहे. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा साधकांना सतत साहाय्य करण्याचा विचार हा संत तुकाराम महाराजांच्या ‘आता उरलो उपकारापुरता’ या उक्तीशी साम्य दर्शवणारा आहे.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १५.२.२०२६, वेळ : सकाळी १०.३०, कालावधी : २० सेकंद)
असे नेते देशाचे कधी भले करू शकतील का ?
‘आपले खरे कुटुंब हे आपले साधक आहेत’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वचनाची साधिकेला आलेली प्रचीती !
राष्ट्रप्रेमी, धर्माभिमानी आणि इतरांना साहाय्य करणारे अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील श्री. मुंडाची वेदव्यास पै (वय ९१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !