सनातनची सात्त्विक उत्पादने म्हणजे आपत्काळातील ‘संजीवनी’च !

१. नियमित उत्पादने घेणारे आणि समाजातील इतर व्यक्ती केवळ ‘सनातनचीच उत्पादने वापरतात’, असे लक्षात येणे

‘सध्या ‘कोरोना’ विषाणूंमुळे देशभरात दळणवळण बंदी लागू केली आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवेमध्ये येणार्‍या वस्तूच आपल्याला मिळतात. दळणवळण बंदीमुळे सनातनची सात्त्विक उत्पादने वाचक, हितचिंतक आणि समाजातील व्यक्ती यांना मिळणे कठीण झाले आहे. ‘नियमित उत्पादने घेणारे लोक केवळ सनातनचीच उत्पादने वापरतात’, असे लक्षात आले.

श्री. अतुल पवार

२. सनातनची उत्पादने नियमित वापरणार्‍या एका व्यक्तीने गो-अर्क मिळण्यासाठी दूरभाषवरून विनवणी करणे

मिरज आश्रमातील स्वागतकक्षात प्रतिदिन न्यूनतम ४ – ५ जण भ्रमणभाषवरून ‘तुमची उत्पादने आली का ? अजून किती दिवस लागतील ?’, असे विचारतात. काही जण आश्रमात येऊनही विचारतात. एकदा मी स्वागतकक्षात बसलो असतांना मला एक दूरभाष आला, ‘‘काहीही करून मला गो-अर्काची एक तरी बाटली द्या किंवा मला ‘गो-अर्क कुठे मिळतो ?’, तो पत्ता द्या. मी तेथे जाऊन ते घेऊन येतो. सनातनसारखा ‘गो-अर्क’ आणि अन्य उत्पादने इतरत्र कुठेच मिळत नाहीत.’’ ती व्यक्ती दूरभाषवर मला एवढी विनवणी करत होती की, तिची ती विनवणी पाहून ‘त्या व्यक्तीला ‘गो-अर्का’चे पुष्कळ महत्त्व वाटत आहे’, हे माझ्या लक्षात आले. ‘ती व्यक्ती सनातनची उत्पादने नियमित वापरते’, असे मला कळले.

३. धान्ये आणि भाजीपाला घेऊन मिरज आश्रमाकडे येणारा धर्मरथ पाहून एक व्यक्ती ‘या धर्मरथात सनातनची उत्पादने आली असतील’, असे समजून दुसर्‍या दिवशी सकाळी उत्पादने घेण्यासाठी मिरज आश्रमात येणे

एकदा सुवचने लिहिलेला सनातनचा धर्मरथ आश्रमासाठी लागणारे धान्य आणि भाजीपाला (अत्यावश्यक साहित्य) घेऊन सायंकाळच्या वेळी मिरज आश्रमाकडे येत होता. मिरजमध्ये धर्मरथाने प्रवेश केल्यानंतर नियमित उत्पादने घेणार्‍या एका व्यक्तीने तो पाहिला आणि तिला वाटले, ‘आता या धर्मरथात सनातनची उत्पादने आली असतील’; म्हणून ती दुसर्‍या दिवशी सकाळी उत्पादने घेण्यासाठी मिरज आश्रमात आली; पण तिला ‘त्यात उत्पादने नसून भाजीपाला आहे’, असे समजल्यानंतर ती म्हणाली, ‘‘मी सात्त्विक उत्पादने मिळण्याची कधीपासून वाट पहात आहे.’’

४. सनातनची सात्त्विक उत्पादने वापरणार्‍यांना विशिष्ट अनुभूती येणे आणि ‘ही उत्पादने अनेक पटींनी अध्यात्मप्रसाराचे कार्य करतात’, हे लक्षात येणे

कोरोनाच्या या काळामध्ये सनातनचा ‘गो-अर्क’ आणि ‘भीमसेनी कापूर’ यांना प्रचंड मागणी आहे. सनातनची उत्पादने वापरून अनेकांना विशिष्ट अनुभूतीही आल्या आहेत, उदा. सनातनचा साबण वापरून त्वचा विकार नाहीसा होणे, उदबत्ती वापरायला चालू केल्यापासून वास्तूची शुद्धी होऊन त्रासदायक स्पंदने न्यून झाल्याने वास्तूत चांगले वाटणे’, असे अनेक अनुभव आहेत. ‘सनातनची सात्त्विक उत्पादनेच अनेक पटींनी अध्यात्मचे कार्य करतात’, असे लक्षात आले. अशा समाजातील अभिप्राय ऐकून ‘सनातनच्या कार्याला मिळालेली ही पोचपावतीच आहे’, असे वाटले.’

– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३१.५.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक