१. झोपतांना ‘गुरुकृपायोग’ असे लिहिलेला कापडी फलक अंगावर नसल्याने झोप न लागणे आणि स्वप्नात अंगावर केशरी रंगाचा चमकणारा एक कापडी फलक पांघरल्याचे दिसून सर्व देवता हवेत तरंगत असल्याचे दिसणे
‘मी नामजपादी उपायांसाठी ‘सनातन संस्थे’चा ‘गुरुकृपायोग’ असे लिहिलेला कापडी फलक (‘बॅनर’) अंगावर चादरीसारखा पांघरून झोपते. (हा कापडी फलक पू. शिल्पा कुडतरकर यांनी नामजपादी उपायांसाठी माझ्या आईला दिला होता.) १४.६.२०२० या दिवशी माझ्या अंगावर तो फलक नसल्याने मला झोप लागत नव्हती; म्हणून मी सर्व देवतांना प्रार्थना केली ‘तुमची शक्ती आणि ज्ञान यांचा कापडी फलक सिद्ध होऊ दे. माझे रक्षण होऊ दे आणि मला झोप लागण्यास साहाय्य होऊ दे.’ तेव्हा मला झोप लागली. स्वप्नात मला माझ्या अंगावर केशरी रंगाचा चमकणारा असा एक कापडी फलक असल्याचे आढळले. तेव्हा मला ‘सर्व देवता हवेत तरंगत आहेत’, असे दिसले.
२. रात्री श्रीकृष्णाला प्रार्थना करूनही झोप न लागणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर झोप लागणे आणि अर्धवट झोपेत असतांना परात्पर गुरु बाजूला असून हसत असल्याचे दिसणे
१.७.२०२०ला रात्री माझ्या मनात काहीतरी वाईट विचार येत असल्याने मला काही केल्या झोप लागत नव्हती. मी श्रीकृष्णाला प्रार्थना करूनही मला झोप लागली नाही. मग मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, मला झोप येऊ दे.’ तेव्हा मला लगेचच झोप लागली. मी अर्धवट झोपेत असतांना मला ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे दृश्य दिसले.
३. सनातन निर्मित उदबत्तीमधून निघणारा धूर सापासारखा दिसणे आणि ‘तो साप वास्तूछताच्या नामपट्ट्यांचे अनिष्ट शक्तींच्या अक्रमणापासून रक्षण करत आहे’, असे वाटणे
२.७.२०२० या दिवशी माझी बहीण वैदेही वास्तुशुद्धी करत होती. तिने शिवाच्या नामपट्टीच्या समोरून उदबत्ती फिरवली. तेव्हा मला उदबत्तीमधून निघणारा धूर सापासारखा दिसला. त्या वेळी ‘तो साप त्या नामपट्ट्यांचेे अनिष्ट शक्तींच्या आक्रमणापासून रक्षण करत आहे’, असे मला वाटले आणि माझी भावजागृती झाली.’
– कु. जान्हवी जेरे (वय १२ वर्षे), सॅन डिएगो, अमेरिका. (२.७.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |