भारतातून हज यात्रेला जाणार्‍यांची ओळखही हिंदू म्हणून होते ! – योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भारताच्या प्रत्येक नागरिकाची ओळख ‘हिंदू’ अशीच आहे. अखंड भारताचा कोणताही नागरिक जेव्हा हज यात्रेसाठी किंवा अन्य कोणत्याही कारणाने विदेशात जातो, तेव्हा त्याची ओळख ‘हिंदू’ अशीच होते. ‘हिंदु’ हा धर्म नाही, तर एक ‘जीवनपद्धत’ आहे. सनातन धर्म हा मूळ धर्म आहे. आम्हा सगळ्यांना आमच्या या ओळखीविषयी अभिमान आहे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत केले.

योगी आदित्यनाथ यांनी पुढे म्हटले की, ‘हिंदु’ शब्दाविषयी काही जणांना इतका द्वेष का आहे ? ते हिंदूंना ‘धर्मांध’ म्हणतात. हे तेच लोक आहेत, जे भारताच्या शक्तीपीठ आदी वारसांचा सन्मान करत नाहीत. संपूर्ण जगाने भगवान श्रीरामाला स्वीकारले आहे; मात्र काही जण त्याचा अद्यापही द्वेष करतात. रामायणाच्या वेळी राक्षस असे करत होते.