पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिसर्‍या अतिरिक्त आयुक्तपदी नगरसचिव उल्हास जगताप नियुक्त !

पिंपरी – महापालिकेचा ब वर्गात समावेश झाल्याने नवीन आकृतिबंधानुसार महापालिकेत ३ अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. यातील २ अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरचे, तर महापालिका अधिकार्‍यांकरता पदोन्नतीसाठी १ अशी तीन पदे निर्माण केली आहेत.

उल्हास जगताप – अतिरिक्त आयुक्त ३

विकास ढाकणे आणि अजित पवार हे प्रतिनियुक्तीवरील २ अतिरिक्त आयुक्त असून प्रशासकीय कामकाजाच्या आवश्यकतेच्या दृष्टीने नगरसचिव उल्हास जगताप यांना अतिरिक्त आयुक्त ३ या पदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे.