सर्जिकल स्ट्राईक

इराणने नुकताच पाकवर सर्जिकल स्ट्राईक करून त्याच्या २ सैनिकांची सुटका केली आहे. हे २ सैनिक गेली अडीच वर्षे पाकच्या कारागृहात खितपत पडले होते.

इराणची ही कृती आपल्याला बरेच काही सांगून जाते. भारताने पाकवर केलेले २ सर्जिकल स्ट्राईक हे पाकने केलेल्या कृत्याचा प्रतिशोध म्हणून होते. अनेक भारतीय पाकच्या कारागृहात अनेक वर्षांपासून खितपत आहेत. अगदी माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचाही त्यात समावेश आहे. बंदीवासातील या भारतियांची काही चूक नसतांना पाकने द्वेषापोटी त्यांना कारागृहात ठेवले आहे. त्यांची सुटका व्हावी, ही सर्वच भारतियांची अपेक्षा आहे. इराण जर त्याच्या सैनिकांना सोडवून आणू शकतो, तर भारताने मागे का रहावे ? सैनिक तर त्यासाठी सिद्धच आहेत. केवळ केंद्र सरकारने आदेश द्यावा, ही भारतियांची मागणी आहे.