‘एका व्यक्तीच्या ‘मी पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश करू शकतो का ?’, या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आम्ही मडगाव येथे ती रहात असलेल्या ठिकाणी तिला भेटायला गेलो. तिच्या बोलण्यातून काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या.
१. एका अन्य पंथीय व्यक्तीने एका व्यक्तीच्या कुटुंबाला फसवणे आणि त्यामुळे त्या कुटुंबाची वाताहात होणे
कर्नाटक राज्यातील एका गावातील त्या व्यक्तीच्या कुटुंबाला एका अन्य पंथीय व्यक्तीने फसवले. त्यामुळे त्या संपूर्ण कुटुंबाची वाईट दशा झाली. तेव्हा त्या व्यक्तीला अन्य पंथीय व्यक्तीचा फार राग आला आणि त्याच्या मनात त्या व्यक्तीचा सूड घेण्याचे विचार येऊ लागले.
२. कुटुंबियांना फसवणारी ती अन्य पंथीय व्यक्ती गोव्याला गेल्याचे कळल्यावर सूड घेण्यासाठी ही व्यक्तीही गोव्याला येणे आणि तिने स्वतःचा धर्म पालटून प्रार्थनास्थळांतून त्या फसवणार्या व्यक्तीचा शोध घेणे
तोपर्यंत ती अन्य पंथीय व्यक्ती त्या गावातून पसार झाली होती. ‘ती फसवणारी व्यक्ती गोवा येथे आहे’, असे कळल्यावर संबंधित व्यक्तीही घर सोडून गोव्याला आली. त्या वेळी ‘फसवणारी व्यक्ती कोणत्यातरी प्रार्थनास्थळात सापडेल’, या विचाराने ही व्यक्ती पणजी येथील प्रार्थनास्थळात गेली आणि त्या व्यक्तीने धर्मांतर केले. त्या वेळी प्रार्थनास्थळातील मुख्य व्यक्तींनी तिला त्यांच्या पद्धतीप्रमाणे काही वाक्ये बोलून धर्मांतरित केले आणि ‘आता तू आमच्या पंथाचा झालास’, असे त्याला सांगितले. त्यानंतर ती व्यक्ती त्या फसवणार्या अन्य पंथीय व्यक्तीचा शोध प्रार्थनास्थळांतून घेऊ लागली.
३. फसवणारी व्यक्ती सापडत नसल्यामुळे ही व्यक्ती निराश होणे आणि तिने पुन्हा हिंदु धर्म स्वीकारण्याचे ठरवणे, त्यासाठी तिने सनातनच्या साधकांना संपर्क करणे, तेव्हा कागदोपत्री हिंदुच असल्याने तिला पुन्हा धर्म पालटण्याची आवश्यकता नसल्याचे लक्षात येणे
पुष्कळ शोधूनही फसवणारी व्यक्ती न सापडल्याने ही व्यक्ती निराश झाली. तेव्हा तिने पुन्हा ‘हिंदु धर्म स्वीकारायचे’, असे ठरवले. तेव्हा हिंदु धर्मासाठी काहीतरी करणारी संघटना म्हणून तिला एका व्यक्तीने सनातन संस्थेचे नाव सांगितले; म्हणून तिने आम्हाला संपर्क केला. ‘बोलण्यावरून तो हिंदुच आहे’, असे आम्हाला वाटत होते आणि ‘तो धर्मांतरित झाला आहे’, असे आम्हाला वाटत नव्हते. प्रत्यक्षात ‘कागदोपत्री हिंदुच असल्याने तिला पुन्हा धर्म पालटण्याची काही आवश्यकताच नव्हती’, असे लक्षात आले.
४. ‘सूड घेण्याच्या एका अयोग्य विचारामुळे व्यक्ती किती भरकटू शकते ?’, हे लक्षात येणे
प्रत्यक्षात सूड घेण्याच्या एका अयोग्य विचाराने व्यक्तीने तिचे रहाते आणि भरले घर सोडले होते. तिने अनावश्यक वेळ वाया घालवला होता आणि एवढे करूनही तिचा उद्देश सफल झालाच नव्हता. त्या वेळी ‘एक अयोग्य विचार माणसाला कसा भरकटवू शकतो ? त्याच्या जीवनाची कशी हानी होऊ शकते ?’, हा भाग लक्षात आला.
५. त्या व्यक्तीला साधनेचे महत्त्व सांगून नामजप लिहून दिल्यावर तिला पुष्कळ कृतज्ञता वाटणे
आम्ही त्या व्यक्तीला साधनेचे महत्त्व सांगितल्यावर तिला पुष्कळ आनंद झाला. ती व्यक्ती म्हणाली, ‘‘मी ज्याच्या शोधात होतो, ते तुमच्या रूपाने मला मिळाले.’’ त्यासाठी त्या व्यक्तीला पुष्कळ कृतज्ञताही वाटत होती. आम्ही एवढ्या लांब तिला त्याच्या अडचणीच्या काळात भेटायला गेल्यावर तिला फारच भरून आले. तिने तसे पुष्कळ वेळा बोलूनही दाखवले. तिला नीट लिहिता येत नव्हते. त्यामुळे आम्ही तिला नामजप लिहून दिल्यावर तिच्या डोळ्यांत अश्रू आले. ‘तो ही देवाचा एक भक्तच आहे’, असे आम्हाला वाटले.
६. कृतज्ञता
‘एकेका जिवाकडे देवाचे कसे लक्ष आहे आणि देवाला त्या जिवाला जे सांगायचे आहे किंवा द्यायचे आहे, त्यासाठी तो कुणाला तरी कसे माध्यम बनवतो’, ते लक्षात आले. गुरुदेवांच्या कृपेमुळे ‘आपण साधनेच्या मार्गावर आहोत आणि विष्णुस्वरूप गुरुमाऊली आपल्या जीवनात आल्याने आपले जीवन सार्थकी लागले आहे’, हे देवाने आम्हाला या प्रसंगातून दाखवून दिले. तेव्हा आम्हाला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
– सौ. वेदिका पालन, फोंडा, गोवा. (२५.११.२०२०)
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |