पुण्यातील नाटक, लोककला आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम यांना अनुमती

पुणे – सांस्कृतिक कार्य विभागाद्वारे कार्यचालन कार्यपद्धतीचा अवलंब करून नाटक, लोककला अंतर्गत तमाशा, लावणी आणि इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना अनुमती देण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. ५ नोव्हेंबरपासून या सर्व कार्यक्रमांना अनुमती देण्यात आली होती; पण जिल्ह्यामधून या सर्व कार्यक्रमांना अनुमती नाकरण्यात आल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडून विभागास मिळत होत्या. याविषयी वरील खुलासा निवासी उपजिल्हाधिकारी कटारे यांनी केला आहे.