१. अनेक साधकांमधून श्रीमती मंगला मट्टीकल्ली यांच्याकडे लक्ष वेधले जाणे
२७.११.२०२० या दिवशी श्री. किशोर आमाती आणि सौ. केशवी आमाती यांचा विवाहसोहळा पार पडला. दुसर्या दिवशी मी त्यांच्या घरी असलेल्या पूजेसाठी गेले होते. तेथे गेल्यावर अकस्मात् माझे लक्ष तिथे बसलेल्या श्रीमती मंगला मट्टीकल्ली यांच्याकडे वेधले गेले. वास्तविक तिथे अनेक साधक बसले असतांना माझे लक्ष त्यांच्याकडेच वेधले गेले, याचे मला आश्चर्य वाटले.
२. त्या भूमीवर बसल्या होत्या आणि माझ्याकडे पहात होत्या. मीही त्यांच्याकडे पहात राहिले; कारण मला त्यांच्यात काहीतरी वेगळेपण जाणवले.
३. त्यांचा आतून नामजप चालू आहे, असे मला जाणवले.
४. मला त्यांच्यात चैतन्य जाणवत होते.
५. त्यांच्यातील प्रेमभावाची स्पंदने वातावरणात प्रवाहित होत होती. मला त्यांच्या शेजारी जाऊन बसावे, असे वाटत होते.
६. त्या आतून पुष्कळ स्थिर आणि शांत होत्या. तेथे जे काही साहाय्य लागत होते, त्या ते कोणतेही प्रश्न न विचारता शांतपणे करत होत्या.
७. त्या भावावस्थेत आहेत, असे मला जाणवले.
८. त्यांनी मला स्पर्श केला. तेव्हा मला त्यांच्यातील चैतन्य माझ्यात प्रवाहित झाल्याचे जाणवले.
९. त्यांची आध्यात्मिक पातळी चांगली असावी, असे मला वाटले. (जानेवारी २०२१ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. – संकलक)
– एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले (२४.१२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |