१. आंतरधर्मीय विवाहांचा (लव्ह जिहादचा) वस्तूनिष्ठ अभ्यास करून त्याचे हिंदु समाजावर झालेले दुष्परिणाम अभ्यासणे आणि त्यावर उपाययोजना करणे, ही काळाची आवश्यकता असणे
अन्य धर्मीय तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लव्ह जिहादद्वारे त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचे जिहाद्यांचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आता हळूहळू उघड होत आहे. तशातच मध्यप्रदेश शासनाने लव्ह जिहादविरोधी कायदा करू नये; म्हणून भारतांतील कित्येक मुसलमान प्रयत्नरत झाले. याच हेतूने अभिनेते महंमद झिशान अय्युब म्हणतात, प्रेम करण्यापूर्वी धर्म पहायचा का ? कि प्रेम करून कारागृहात जायचे ? हिंदू तरुणींनो, अहिंदूच्या अशा गोड बुद्धीवादाला आणि बोलण्यातील साखरपेरणीला भुलू नका ! नाटकी प्रेम आणि नाटकी धर्म यांच्या माध्यमातून करण्यात येणार्या धर्मांतराची भीषणता जाणा ! सर्वधर्मसमभावाचे वेड सोडून द्या. आतापर्यंत झाली तेवढी हानी पुष्कळ झाली. यापुढे तरी लव्ह जिहादच्या या समस्येवर उपाय काढण्यासाठी आत्मबळ, म्हणजे धर्मबळ वाढवायला हवे. बुद्धीमान भारतियांनो (हिंदूंनो), आंतरधर्मीय विवाहांचा वस्तूनिष्ठ अभ्यास करण्याची आणि त्यासाठी धर्मसंघटन करून कायदे करायची वेळ आता आली आहे.
२. अभिनेते महंमद झिशान अय्युब यांना अपेक्षित असा हाच का तो धर्म आणि हेच का ते आदर्श प्रेम !
अ. हिंदु मुलींच्या कपाळावरचे कुंकू पहाताच या अधर्मींच्या (अन्य धर्मियांच्या) प्रेमाला भरती येते. असे का होते ? त्यांच्या धर्मात (पंथात) चांगल्या मुली नाहीत का ?
आ. प्रेम करतांना अन्य धर्मियांकडून आपले नाव आणि ओळख लपवली जाते. हिंदू नाव धारण केले जाते. साहिल खानचा साहिल सिंह बनतो. अब्दुल रझाकचा संजू बनतो. विवाहित असूनही अविवाहित असल्याचे सांगितले जाते. अशी लपवाछपवी त्यांना का करावी लागते ?
इ. यांच्याकडून विवाहापूर्वी हिंदु मुलींशी शारीरिक संबंध ठेवून लैंगिक शोषणासह चित्रीकरण केले जाते. ती अश्लील छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर पोस्ट करण्याची धमकी देऊन खंडणी मागितली जाते. धर्मांतरणास विवश केले जाते. हाच का पतीचा धर्म आणि हेच का पत्नीवरील त्याचे प्रेम ? पत्नी समवेत असतांना चित्रीकरण करण्याची आवश्यकताच का वाटते ?
ई. दोन – तीन मित्रांसह हिंदु मुलीवर बलात्कार केला जातो. त्या वेळी पत्नी ही सार्वजनिक मालमत्ता असते का ?
उ. हिंदु मुलीचे सौभाग्यचिन्ह असलेले कुंकू पुसून तिने धर्म पालटावा, यासाठी तिच्यावर अत्याचार होतात. ती धर्म पालटायला नकार देत असेल, तर तिच्या सवती आणि तिची सासू तिला त्रास देतात. दीर अन् सासरे तिच्यावर बलात्कार करतात. तिचा पती तिला तलाक देतो. त्या मुलीला पशूपेक्षाही हीन जीवन जगावे लागते. ही सर्व सूत्रे प्रेमाची लक्षणे आहेत का ?
ऊ. शिकार आणि शिकारी यांच्यात प्रेम असते का ? ही तर आसुरी (वखवखलेली) वासना ! उंदीर सापळ्यात सापडावा, यासाठी पिंजर्यात भजी (त्याच्यासाठी खाऊ) ठेवतात. त्यात त्याच्याविषयी प्रेम असते का ?
ए. लांडगा कोकराचा (शेळीचा) गळा (नरडी) पकडतो. या गळाभेटीला प्रेम म्हणायचे का ? अधर्मींनी धर्म आणि प्रेम याचे नावच घेऊ नये. उच्छृंखल आणि पाशवी वृत्तीला तो अधिकारच नाही.
ऐ. सून हिंदूच हवी; मात्र हिंदु जावई नको. असा दुजाभाव का ? असा एखादा अपवादही सहन केला जात नाही. त्याला धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते किंवा अहिंदू सामूहिक आक्रमण करून त्याला मृत्यूदंड देतात. (उदा. राहुल राजपूत, देहली.)
ओ. प्रेम करायला मुलगी हिंदूच लागते; मात्र तिच्याशी विवाह करायला हिंदुत्व आड येते. असे का होते ?
औ. मुलीने लग्नाला नकार दिला, तर तिला गोळी झाडून ठार केले जाते (उदा. निकिता तोमर) किंवा गळा चिरला जातो. दिवस गेले, तर पोटावर लाथ हाणली जाते. पशूही असे करत नाहीत. ही कसली लक्षणे आहेत ? हाच का मानवधर्म ? हेच का उतू जाणारे प्रेम ?
जेव्हा धर्माच्या नावाखाली अधर्म आणि प्रेमाच्या नावाखाली वासना थैमान घालते अन् या दोन्हींचे पर्यवसान हिंदु कन्येचेे धर्मांतर करण्यात होते, तेव्हा ते लव्ह जिहादच असते, हे सर्व सूज्ञ जाणतातच ! (त्यामुळे अशा प्रेमासाठी तुम्ही कारागृहात मुळीच जाऊ नका. आता तुम्हाला कारागृहातही फुकट पोसायची हिंदूंची सिद्धता नाही.)
३.लव्ह जिहादमुळे हिंदूंच्या विवाहाचे उद्दिष्टच नष्ट होऊन हिंदु समाज पूर्णपणे उद्ध्वस्त होणे
हिंदु धर्म त्याग शिकवतो. अनियंत्रित कामवासना आणि स्वैराचार यांवर नियंत्रण ठेवणे, समाजऋण फेडणे, प्रजोत्पादन, वंशसातत्य, सामाजिक स्थैर्य, सामाजिक दायित्व, समाजाची धारणा, ही विवाहाची उद्दिष्टे आहेत. आंतरधर्मीय विवाहाने ती साध्य होत नाहीत. आंतरधमीर्र्य विवाहाने समाजधारणा न होता समाजविघटन होते.
स्त्रीला गृहिणी असे नाव आहे. ती घराचे सौंदर्य, प्रेम, आस्था, स्थैर्य आहे. ती शक्ती आहे. तिच्याविना शिवही शव होतो. कुटुंबातील कन्या, तसेच पत्नीचे अपहरण केल्याने ते घर उद्ध्वस्त होते. ते स्मशानासारखे बनते. धर्मांतर झाल्यावर स्त्री आणि तिचा वंश कडवा बनतो. वासनेला बळी पडण्याची चूक केली, हे त्या स्त्रीला मान्य नसते. माझे कुटुंब, माझा समाज, माझी फरपट पहात राहिला. माझ्यासाठी कुणीच काही केले नाही. माझे कुणीच रक्षण केले नाही, या विचारांचा डंख (दंश) तिच्या मनाला होतो आणि ती विषारी नागीण बनून स्वतःचे घर अन् समाज म्हणजे हिंदु समाज नष्ट करते. अशा प्रकारे अपहरण झालेली ती स्त्री दुधारी सुरी बनून हिंदूंचा नाश, म्हणजे आत्महननच करते. आतापर्यंतचा इतिहास हेच सांगतो की, धर्मांतरित (बाटगे) अधिक कडवे अन् विध्वंसक असतात.
४. हिंदु तरुणांनो, तुम्ही अन्य धर्मियांनी केलेलीच चूक करू नका !
शस्त्राघाताचे शस्त्रच उत्तर ! (म्हणजे शस्त्राला शस्त्रानेच उत्तर देणे) या न्यायाने काही हिंदु तरुण लव्ह जिहादला प्रत्युत्तर म्हणून अन्य धर्मीय, म्हणजे विशेषतः इस्लाम पंथीय मुलींशी विवाह करून त्यांना धर्मांतरित करण्याची इच्छा व्यक्त करतात; पण हे योग्य नाही; कारण जिहादींनी केले, तेच आपण करणे, म्हणजे आपणही त्याच समस्या निर्माण करणे होय.
साखरेत मीठ मिसळले काय आणि मिठात साखर मिसळली काय, भेसळ तीच होणार ना ? या कृतीनेे प्रश्न सुटत नाही. हिंदुत्व म्हणजे भेसळ नाही. हिंदुत्व म्हणचे सात्त्विकता ! ती टिकवून ठेवण्यासाठी केवळ हिंदु धर्मच समर्थ आहे.
५. हिंदु मुली लव्ह जिहादला बळी का पडतात ?
५ अ. लग्नाआधी आणि लग्नानंतरही हिंदु धर्मात स्त्रियांना स्वातंत्र्य दिले जाऊन सन्मानाने वागवले जाणे : हिंदु धर्मात स्त्रियांना जेवढे स्वातंत्र्य, सन्मान आणि प्रेम मिळते, तेवढे अन्य पंथियांत कुठेच मिळत नाही. हिंदु धर्मात ना बुरखा ना पडदा, मुलींना मुलांएवढीच शिक्षणाची संधी आहे. काही कुटुंबात मुलगी थोड्या दिवसांची पाहुणी (लग्न झाल्यावर दुसर्या घरी जाणार) असल्याने पालक मुलांपेक्षाही मुलींचे लाड अधिक करतात. हिंदु धर्माने विवाहानंतर पत्नीला धर्म, अर्थ आणि काम यांमध्ये पतीच्या बरोबरीने समान संधी दिलेली आहे.
५ आ. हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व पटवण्यात अन् अन्य पंथातील त्रुटी मुलींच्या लक्षात आणून देण्यात हिंदू अल्प पडणे : अशा सर्वांगसुंदर आणि परिपूर्ण धर्मात जन्म घेऊनही मुली पळून का जातात ? अन्य पंथियांकडे आकर्षित का होतात ? शत्रूंची शिकार का बनतात ?, याचा विचार केल्यास आपले कुठे चुकले, हे लक्षात येईल. हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व पटवण्यात अन् अन्य पंथांतील त्रुटी लक्षात आणून देण्यात आपण अल्प पडलो.
५ इ. धर्मशिक्षणाचा अभाव, एकतर्फी सर्वधर्मसमभाव आणि पाश्चात्त्य शिक्षणामुळे पसरलेली भोगवृत्ती यांमुळे मुले वास्तवापासून दूर जाऊन शत्रूची शिकार होणे : आपण मुला-मुलींना धर्मशिक्षण दिले नाही. त्यामुळे एकतर्फी सर्वधर्मसमभाव, पाश्चात्त्य शिक्षणामुळे बोकाळलेली विलासी वृत्ती, सिनेसृष्टीतील भोगवाद, सामाजिक मालिकांचा दुष्परिणाम, या सर्वांचा एकत्रित परिणाम; म्हणून आपली मुले वास्तवापासून दूर गेली. स्वप्नातील दृश्याला सत्य मानून त्या मागे धावली. ऊर फाटेपर्यंत मृगजळामागे धावली आणि उद्ध्वस्त झाली. शत्रूचे बकध्यान न कळल्यामुळे त्यांची शिकार झाली. आपण हिंदूच त्यांना घडवायला अल्प पडलो.
६. पालकांचे आणि समाजाचे दायित्व
अ. मुलांना धर्मशिक्षण आणि धर्माचरण शिकवल्यामुळे मुलांचे आत्मबळ वाढेल.
आ. आईने किशोरावस्थेतील मुलांकडे विशेेषकरून मुलींकडे आणि बालकांकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलावे. त्यांची मैत्री कुणाशी आणि किती प्रमाणात आहे, हे मधे- मधे जाणून घ्यावे.
इ. पद्मिनीने केलेला जोहार, पाकिस्तान फाळणीच्या वेळी नराधमांनी स्त्रियांवर केलेले अमानुष अत्याचार यांसंदर्भांत वेळ-प्रसंग पाहून मुलींना सांगायला हवे. मुलींमधील दुर्गातत्त्व जागृत करायला हवे.
ई. अन्य पंथियांची कपटी कारस्थाने, कुटील हेतू, त्याला बळी पडलेल्या असंख्य कन्यांची दुरवस्था त्यांच्या कानावर घालायला हवी. मुलींना या संदर्भात जागृत करायला हवे.
उ. मुलांमुलींना साधना शिकवली, देवाचे साहाय्य घ्यायला शिकवले, तर करणी, जादू, अनिष्ट शक्ती यांच्या आक्रमणांपासून देवच त्यांचे रक्षण करील. अशी मुले बरे-वाईट (हे प्रेम आहे कि वासना आहे, हे) जाणू शकतील.
ऊ. मुलींनो, धर्म पहा आणि मगच प्रेम करा ! हा संदेश मुलींना द्यायलाच हवा. ज्यांची संपत्ती आणि शील समान असते, त्याची मैत्री आणि विवाह टिकतो. अन्यथा नाही. हिंदु धर्मात घटस्फोट नाही. तलाक नाही. हिंदु धर्मात पती-पत्नीने सप्तलोकापर्यंत एकमेकांना साहाय्य करत मोक्षाला जायचे आहे. पती हा पत्नीसाठी गुरु आहे. आनंदप्राप्तीत साहाय्यक आहे. हिंदु धर्मात पती शिकारी आणि पत्नी सावज नाही, हे आपणच त्यांना सांगायला हवे.
ए. समाज संघटन आणि हिंदू हिताचे कायदे करण्यासाठी सर्व हिंदूंनी सतत प्रयत्नरत रहायला हवे. असे कडक कायदेच हिंदूंचे रक्षण करू शकतात. त्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांप्रमाणे ज्या हिंदुत्वनिष्ठ संस्था कार्यरत आहेत, त्यांच्याशी आपल्याला जोडून घ्यायला हवे. आपले संघटन जर पक्के असेल, तर धर्मांधांना एकाही हिंदु मुलीकडे वाकड्या नजरेने पहाण्याचे धाडस होणार नाही. त्यासाठीच सर्व समाजाने संघटित व्हायचे आहे आणि आपल्याला हिंदु राष्ट्र आणायचे आहे.
७. देवाचे भक्त झाल्यावरच आपल्याला देवाचे साहाय्य मिळते, हे सूत्र देवाने शिकवणे
एकदा लव्ह जिहादचा एक प्रसंग वाचून माझे मन कळवळले. तेव्हा मी आत्मनिवेदन करतांना श्रीकृष्णाला म्हणाले, हे श्रीकृष्णा, प्रतिवर्षी सहस्रो हिंदू कन्या लव्ह जिहादला बळी पडतात. तुला त्याचे काहीच वाटत नाही का रे ? त्यांचे रक्षण तुझ्याविना कोण करणार ? त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, मी भावनाशीलता पहात नाही, तर भाव पहातो. माझ्यावर अनन्य निष्ठा ठेवून जो अंतःकरणातून मला आर्ततेने हाक मारतो, त्याच्यासाठी मी धावतो. जो माझे स्मरणही करत नाही त्याच्यासाठी मी का धावावे ? त्यानंतर मला यदुकुलाचा (स्वतःच्या वंशाचा) नाश पहातांना साक्षीभावात असलेेला श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या भावामुळे तिचे हरण अन् पाणिग्रहण (विवाह) करणारा भावाचा भुकेलेला श्रीकृष्ण अशी कृष्णाची दोन रूपे सूक्ष्मातून दिसली.
नरकासुराचा वध करून १६ सहस्र कन्यांना कारागृहातून मुक्त करणारा श्रीकृष्ण आपल्यालाही साहाय्य करणार आहे; पण आपण त्याला आर्ततेने आणि निष्ठेने हाक मारायला हवी. यातून देवाचे भक्त झाल्यावरच आपल्याला देवाचे साहाय्य मिळते, हे सूत्र मला शिकायला मिळाले.
हिंदूंनो, आपण जग पालटू शकत नाही; पण स्वतःला, तर पालटू शकतो. आपण धर्मांतराची भीषणता ओळखूया ! त्यावरील उपाय म्हणून धर्मबळ वाढवूया आणि हिंदूहिताचे कायदे बनवण्यासाठी संघटित होऊन प्रयत्न करूया ! ईश्वर (गुरुदेव) आपली वाट पहात आहे.
गुरुदेवांच्या हे चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.
– सौ. शालिनी मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१२.२०२०)