कंबोडियाकडूनही भारताकडे कोरोनावरील लसींची मागणी

कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन

नवी देहली – भारतात कोरोनावरील स्वदेशी लस निर्माण केल्यावर १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. आता जगातील अनेक देशांनी भारताकडे या लसींची मागणी केली आहे. कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांनीही भारताकडे कोरोना लसीची मागणी केली आहे.

चीनने यापूर्वी कंबोडियाला १० लाख लसी दिल्या आहेत, तरीही कंबोडियाच्या पंतप्रधानांनी भारताकडे लसींची मागणी केली आहे.